घरमनोरंजनराज कुंद्राच्या अटकेबद्दल शिल्पा म्हणाली, 'मी शांतच, फक्त माझ्या मुलांना यापासून दूर...

राज कुंद्राच्या अटकेबद्दल शिल्पा म्हणाली, ‘मी शांतच, फक्त माझ्या मुलांना यापासून दूर ठेवा’

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिचे पती राज कुंद्राला अश्लील चित्रपट निर्मिती आणि व्यापार करण्याच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर दोन आठवड्यांनी तिने एक निवेदन जारी केले आहे. शिल्पाचा पती राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगात आहे. अशा परिस्थितीत शिल्पा शेट्टीवर अनेक आरोप केले जात आहेत आणि तिच्याबद्दल अनेक अफवाही उडत आहेत. आता शिल्पाने या सर्व गोष्टींसोबतच तिच्या ट्रोलिंगबद्दल हे निवेदन जारी केल्याचे दिसतेय. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या निवेदनात शिल्पाने म्हटले आहे की, तिचा मुंबई पोलीस आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. यासोबतच ती असे देखील म्हटली की, मी आता गप्प आहे आणि यापुढेही गप्प राहील आणि कालांतराने सत्य सर्वांसमोर येईल.

अशी म्हणाली शिल्पा…

शिल्पाने असे लिहिले की, ‘होय, गेले काही दिवस माझ्यासाठी कठीण होते. आमच्यावर अनेक अफवा आणि आरोप केले जात आहेत. मीडियाने आणि माझ्या ‘हितचिंतकांनी’ माझ्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये फक्त मलाच नाही तर माझ्या कुटुंबालाही ट्रोल केले जात आहे आणि आमच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माझी भूमिका अशी आहे की, मी अजून काही बोलले नाही आणि या प्रकरणावर मी अजून गप्पच राहणार आहे. त्यामुळे माझ्या कोणत्याही अफवा पसरवू नका. ‘

- Advertisement -

या निवेदनात ती पुढे म्हणाली की, एक सेलिब्रिटी म्हणून माझी फिलॉसफी अशी आहे, कधीही तक्रार करू नका आणि कधीही स्पष्टीकरण देऊ नका. मी एवढेच म्हणेन की आता तपास चालू आहे. माझा मुंबई पोलिस आणि भारतीय न्यायालयावर विश्वास आहे. एक कुटुंब म्हणून आम्ही कायदेशीर मदत घेत आहोत. पण तोपर्यंत मी तुम्हाला विनंती करतेय, विशेषत: आई म्हणून, आमच्या मुलांच्या फायद्यासाठी आमच्या कुटुंबाच्या प्रायव्हसीता आदर करा. तसेच, मी तुम्हाला विनंती करते की सत्य जाणून घेतल्याशिवाय कोणत्याही अपूर्ण माहितीवर कमेंट करणं थांबवा.

- Advertisement -

‘गेल्या २९ वर्षांपासून मी काम करणारी प्रोफेशनल महिला आहे, आणि मी कायद्याचे पालन करणारी भारतीय आहे. लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि मी कधीही कोणाचा विश्वास मोडला नाही. म्हणून मी तुम्हाला विशेषतः विनंती करते की माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या प्रायव्हसीच्या अधिकाराचा आदर करा आणि यावेळी आम्हाला एकटे सोडा. आम्हाला मीडिया ट्रायलची गरज नाही. कृपया कायद्याला त्याचे काम करू द्या. सत्यमेव जयते. ‘, असे शिल्पा आपल्या निवेदनाच्या अखेरीस म्हणाली.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -