घरमनोरंजनराखी- मिकातली १५ वर्षांची कट्टर दुश्मनी संपली या व्यक्तीमुळे, पुन्हा दिसले एकत्र

राखी- मिकातली १५ वर्षांची कट्टर दुश्मनी संपली या व्यक्तीमुळे, पुन्हा दिसले एकत्र

Subscribe

मिका सिंग सोबत उडालेले राखी सावंतचे खटके. काही वर्षांपूर्वी मिकाआणि राखी मधला वाद विवाद मोठ्या प्रमाणात उफाळून आला होता .

बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून संबोधली जाणारी अभिनेत्री आणि डांन्सर राखी सावंतच्या चर्चा सोशल मीडिया तसेच माध्यमांवर रंगतात. राखीच्या अनेक वाद – विवादाची सुद्धा इंडस्ट्री मध्ये खूप चर्चा होते. त्यातील एक सर्वाधिक मोठ भांडण म्हणजे मिका सिंग सोबत उडालेले राखी सावंतचे खटके. काही वर्षांपूर्वी मिकाआणि राखी मधला वाद विवाद मोठ्या प्रमाणात उफाळून आला होता . पण आता एका व्हिडिओ वरुन  दिसून येत आहे की दोघांमध्ये चांगलीच गट्टी जमली आहे. एकेकाळी एकमेकांच तोंड न पाहणारे जानी दुश्मन आज गळाभेट घेताना दिसत आहे.

काय आहे व्हिडिओ मध्ये ?

- Advertisement -

विरल भयानी यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट वरुन दोघांचाही व्हिडिओ शेअर केला आहे. 15 वर्षाच्या विवादानंतर दोघेही मुंबईतील एका कॉफी शॉपच्या बाहेर भेटले. राखी सावंत कॉफी शॉपच्या बाहेर पत्रकारांशी बोलत होती की सलमान खानच्या चित्रपटाबद्दल कोणीही वाईट बोलू नका मिकाने सुद्धा राधे चित्रपट अनेक गाणी गायली  आहेत. माझ्या आईच्या ऑपरेशनसाठी सुद्धा सलमानने माझी मदत केली आहे असतांना. मिका सिंग तेथून जात होते आणि राखीला पाहून थांबले.मिकाने पत्रकारांना संगितले आता आम्ही चांगले मित्र आहोत. तसेच राखीची प्रशंशा करत म्हणाला बिग बॉस फक्त राखी सावंतमुळे चालला होता. मीकाचे शब्द ऐकताच राख आनंदाने मिकाचे पाया पडू लागली. सध्या दोघांनाची व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. चाहते व्हिडिओवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

काय होता दोघांमधील वाद ?

2006 साली राखी सावंतने वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन केले होते आणि यादरम्यान मिका सिंग देखील हजर होता. राखीने केक कापल्या नंतर सर्वांसमोर मिकाने राखीसोबत लिपलॉक केले . या घटनेनंतर राखीने मिका विरोधात कोर्टात धाव घेतली होती.


हे हि वाचा – इरा खानचा नवीन उपक्रम,अमीर खानच्या मुलीने केली ‘अगत्सु फाउंडेशन’ ची स्थापना!

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -