घरमनोरंजनदिवाळीनिमित्त रानू मंडलचा लाईव्ह परफार्मन्स झाला व्हायरल!

दिवाळीनिमित्त रानू मंडलचा लाईव्ह परफार्मन्स झाला व्हायरल!

Subscribe

देशभर दिवाळी आनंदात साजरी करण्यात येत आहे. दिवाळीच्या निमित्ताने रानू मंडलचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

तेरी मेरी कहानी द्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या रानू मंडलने थोड्याच कालावधीत यशाचे शिखर गाठले. तेरी मेरी कहानी या गाण्यामुळे रानू मंडल यांनी सोशल मीडियासह लोकांच्या हृदयात जागा मिळवली. सध्या देशभर दिवाळी आनंदात साजरी करण्यात येत आहे. दिवाळीच्या निमित्ताने रानू मंडलचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

या व्हिडीओमध्ये रानू बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान याच्या दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे या सुपरहिट चित्रपटातील तुझे देखा तो ये जाना सनम हे गाणे गाताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रानू स्टेजवर लाईव्ह परफॉर्मन्स देत आहे.

- Advertisement -

बंगाली टीव्ही शो कॉमेडी स्टार्स या कार्यक्रमात रानू मंडल गेल्या होत्या. या कार्यक्रमात त्यांनी शाहरुख खानचे गाणे सादर केले. रानू मंडलच्या गोड गळ्याने तेथे उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकली. डेलीहंट ऑफिशिअल यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रानूचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान रानू मंडल यांचा रेल्वे स्थानक परिसरातील गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गायक हिमेश रेशमिया याने त्यांना चित्रपटात गाण्याची संधी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -