घरमनोरंजनदिल्लीत 'सांड की आँख' टॅक्स फ्री; केजरीवाल यांनी केले असे ट्विट

दिल्लीत ‘सांड की आँख’ टॅक्स फ्री; केजरीवाल यांनी केले असे ट्विट

Subscribe

उत्तर प्रदेशमध्ये देखील टॅक्स फ्री करण्यात आल्याची घोषणा

दिल्लीच्या सरकारने शुक्रवारी दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेला ‘सांड की आँख’ चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. या चित्रपटात तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर या दोन्ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भात नुकतेच एक ट्विट केले आहे. ”दिल्ली सरकारने दिल्लीमध्ये ‘सांड की आँख’ चित्रपट टॅक्स फ्री केला असून या चित्रपटांचा विषय सर्वांपर्यंत पोहोचायला हवा.”

- Advertisement -

देशातील सर्वात प्रसिद्ध असणारे नेमबाज म्हणून प्रकाशी तोमर व चंद्रो तोमर यांच्यावर हा चित्रपट आधारलेला आहे. या चित्रपटाला उत्तर प्रदेशमध्ये देखील टॅक्स फ्री करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. शुक्रवारी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्याआधीच तुषार हिरानंदानी यांनी दिग्दर्शन केलेला चित्रपट २१ व्या मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटाची निर्मिती बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता अनुराग कश्यप यांनी केली असून त्यांचे दिगदर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -