घरमनोरंजनकोरोनाबधित रुग्णांकरिता रॅपर डिवाइन करणार डिजिटल लाईव्ह शोद्वारे आर्थिक मदत!!

कोरोनाबधित रुग्णांकरिता रॅपर डिवाइन करणार डिजिटल लाईव्ह शोद्वारे आर्थिक मदत!!

Subscribe

प्रसिद्ध रॅपर डिवाइन याने शनिवारी आपल्या प्रशंसकांसाठी ऑनलाइन लाईव परफॉरमन्स चे आयोजन केले आहे. आणि या अभियानाअंतर्गत कोरोनाबाधित रुग्णा करिता आर्थिक सहयोग करणार असल्याचे घोषित केले आहे

कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोना व्हायरसची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. आपुर्‍या सोयी सुविधा अभावी अनेक रुग्ण दगावत आहेत. अशातच अनेक कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. प्रसिद्ध रॅपर डिवाइन याने शनिवारी आपल्या प्रशंसकांसाठी ऑनलाइन लाईव परफॉरमन्स चे आयोजन केले आहे. आणि या अभियानाअंतर्गत कोरोनाबाधित रुग्णा करिता आर्थिक सहयोग करणार असल्याचे घोषित केले आहे. झोया अख्तर दिग्दर्शित प्रसिद्ध चित्रपट ‘गली बॉय’ पहिलाच असेल या सिनेमामध्ये रॅपर डिवाइन आणि नेएजी यांच्या आयुष्यावर चित्रित करण्यात आला होता. तसेच या सिनेमात अनेक गाण्याद्वारे त्याने योगदान दिले होते. आपल्या डिजिटल लाईव्ह शो बद्दल बोलतांना रॅपर डिवाइन याने माहिती दिली आहे की,”लोकांचे घरात बंदिस्त असताना या दरम्यान त्यांचे मनोरंजन करणे हे आम्हा कलाकाराचा धर्म आहे. या अंतर्गत आम्ही आमच्या चाहत्यांचे मनोरंजन करतोच आणि तसेच त्यांना थोड्या प्रमाणात व्यस्त देखील ठेवतो. अनेक कलाकारांनी मिळून या अभियानाची सुरुवात केली आहे. आणि या कार्यकामाअंतर्गत कोव्हिड 19 च्या लढाई करिता आर्थिक मदत करण्यास माला प्रेरित करत आहे. माला खूप आनंद होत आहे की मी आपल्या चाहत्यासोबत मिळून या कामामध्ये माझे योगदान देत आहे”

 

View this post on Instagram

 

A post shared by DIVINE (@vivianakadivine)

- Advertisement -

सध्या जगभरामध्ये कोरोनाबधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतांना दिसत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अनेक राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अशातच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने लोकांकडे मदतीचे आवाहन करत तब्बल 22 कोटी रुपये रक्कम कोरोना बाधितरुग्णांकरिता मदतीसाठी जमा केली होती. अनेक सेलेब्रिटी लढाईत पुढे येऊन मदत करण्यास उभे राहत आहेत.

 

- Advertisement -

हे हि वाचा – कंगना रनौतच्या बॉडीगार्ड विरोधात महिलेसोबत गैरवर्तन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल !

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -