घरताज्या घडामोडीरिहानाचे शेतकरी आंदोलनावर ट्विट; कंगना म्हणाली, 'ऐ मुर्ख ते शेतकरी नाही तर...

रिहानाचे शेतकरी आंदोलनावर ट्विट; कंगना म्हणाली, ‘ऐ मुर्ख ते शेतकरी नाही तर दहशतवादी!’

Subscribe

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीतील वेगवेगळ्या बॉर्डरवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. अनेक कलाकारांनी या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. यामध्ये आता जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहाना (rihanna) देखील सामिल झाली आहे. रिहानाने शेतकरी आंदोलना संदर्भात एक ट्विट केलं आहे आणि ‘आपण याबद्दल का बोलत नाही?’ असा सवाल तिने केला आहे. तसंच तिने हे ट्विट करत#FarmersProtest वापर केला आहे. रिहानाच्या याच ट्विटवर (rihanna tweets) नेहमी वादग्रस्त वक्तव्य करणारी बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौतने (kangana ranaut)ट्विट करून आंदोलन करणारे शेतकरी नाही तर दहशतवाही, असं म्हटलं आहे.

रिहानाच्या ट्विटमध्ये नेमकं काय आहे?

रिहानाने आपल्या ट्विटमध्ये (rihanna on farmers) सीएनएन वृत्त संस्थेचीची एक बातमी शेअर केली आहे. यामध्ये आंदोलनादरम्यान दिल्लीतील परिसरात इंटरनेट बंद करण्याची बातमी देण्यात आली आहे.

- Advertisement -

रिहानाच्या ट्विटवर कंगनाचं प्रत्युत्तर काय?

रिहानाने ट्विट केल्यानंतर कंगनाने तिला प्रत्युत्तर दिलं आहे. कंगनाने ट्विट करून म्हटलं आहे की, ‘याबद्दल कोणीही बोलत नाही कारण ते शेतकरी नाही तर दहशवादी आहेत, जे भारताचे विभाजन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जेणेकरून चीन आपल्या असुरक्षित तुटलेल्या देशाचा ताबा घेईल आणि अमेरिकेसारखी चीन वसाहत तयार करेल. तू शांत बस, मुर्ख. तुझ्यासारखे आम्ही मुर्ख नाही आहोत, जो आमचा देश विकू.’ त्यामुळे आता कंगना या वादग्रस्त ट्विटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

- Advertisement -


हेही वाचा – कंगनाच्या अडचणीत वाढ; मानहानीच्या प्रकरणात पुन्हा समन्स बजावला


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -