बॉलिवूडच्या भाईजाने आपल्या चाहत्यांसाठी ‘दबंग ३’चे नवीन गाणं प्रदर्शित केलं आहे. या गाण्याचे नाव ‘यू करके’ असून निर्मात्यांनी या गाण्याचे ऑडिओ व्हर्जन प्रदर्शित केलं आहे. ‘दबंग ३’च्या या नवीन गाण्याला आलेल्या प्रतिक्रिया पाहता लवकरच याचा व्हिडिओ देखील प्रदर्शित करण्यात येणार आहे. सलमान खानने देखील हे गाण्याचे ऑडिओ व्हर्जन इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलं आहे. विशेष म्हणजे हे गाणं सलमान खानने गायलं आहे.
सलमान खानच्या या नव्या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी ‘दबंग ३’या चित्रपटाचा टायटाल ट्रॅक प्रदर्शित करण्यात आला होता. आता फक्त ‘दबंग ३’ प्रक्षेकांच्या भेटीला येण्यास ४० दिवस बाकी आहेत. सलमान खानने याअगोदर बऱ्याचदा चित्रपटात गाणं गायलं आहे.
सलमान खानने गायलेली गाणी ही प्रत्येक वयोगटातील लोकांना आवडतात. ‘दबंग ३’ या चित्रपटातील ‘यू करके’ या गाण्याला लोकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवाने केले असून निर्मिती सलमा खान, अरबाद खान आणि निखिल द्विवेदी यांनी केली आहे. ‘दबंग ३’ हा चित्रपट २० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा – केबीसीतल्या ‘त्या’ प्रश्नांवर बिग बींनी मागितली माफी