घरताज्या घडामोडीसलमान-जॅकलिनच्या 'तेरे बिना' गाण्यात कोण आहे ही मुलगी?

सलमान-जॅकलिनच्या ‘तेरे बिना’ गाण्यात कोण आहे ही मुलगी?

Subscribe

सलमान-जॅकलिन 'तेरे बिना' हे नवं गाणं युट्युबरवर ट्रेंडिंग नंबर १ आहे.

लॉकडाऊनमुळे बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी घरी असल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. या लॉकडाऊनच्या काळात बॉलिवूडचा सुलतान सलमान खान पनवेलच्या फार्म हाऊसवर अडकलेला आहे. तरी देखील नुकतचं सलमान खान आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच ‘तेरे बिना’ हे नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात एक नवा चेहरा देखील दिसला आहे.

सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडिस या दोघांच्या मुलीची भूमिकेत हा नवा चेहरा दिसला आहे. या गाण्यातील ही मुलगी मॉडेल वलुशा डिसूजाची मोठी मुलगी सिएना रॉबिनसन आहे.

- Advertisement -

सध्या वलुशा पण सलमान खानसोबत पनवेलच्या फार्म हाऊसवर आपल्या कुटुंबियांसोबत आहे. सलमान आणि त्याचे कुटुंबियांचे वलुशासोबत खूप चांगले संबंध आहे. काही दिवसांपूर्वी वलुशाने सलमान आणि जॅकलिनची मुलाखत घेतली होती.

View this post on Instagram

@jacquelinef143 @waluschaa

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

- Advertisement -

युट्युबवर सलमान आणि जॅकलिनचं हे नवं गाणं ट्रेंडिंग नंबर १ वर आहे. आतापर्यंत ५४ लाखांहून अधिक जणांनी हे गाणं पाहिलं आहे. तसंच ६ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. यापूर्वी सलमान खानचं ‘प्यार कोरोना’ हे गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं होत. यामध्ये कोरोना आजाराशी लढण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या डॉक्टर, नर्स, पोलिसांना त्याने हे गाणं समर्पित केलं होत. तसेच अशा कठिण प्रसंगी प्रेम करा, आपुलकीने वागा, एकजूट रहा, संपर्क टाळा असे संदेश त्याने दिले होते.


हेही वाचा – CoronaVirus: एअर इंडियाच्या त्या पाच पॉझिटिव्ह वैमानिकांचा अहवाला चुकीचा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -