घरCORONA UPDATEहॅट्स ऑफ! ९ महिन्यांची गर्भवती असतानाही ती करतेय रूग्णांची सेवा!

हॅट्स ऑफ! ९ महिन्यांची गर्भवती असतानाही ती करतेय रूग्णांची सेवा!

Subscribe

रूपा प्रवीण राव या त्यांच्यापैकी एक आहेत जे सध्या आपले आयुष्य धोक्यात टाकून कोरोनाशी लढत आहे.

कर्नाटकच्या शिवमोगा हॉस्पिटलमध्ये काम करणारी रूपा प्रवीण राव ही महिला लवकरच आई होणार आहे. मात्र ९ व्या महिन्यातही ही महिला रूग्णांची सेवा करण्यात रमली आहे. देशभरात कोरोनाचा वाढता प्रभाव बघता ही महिला प्रेग्नंट असतानाही कोरोना रूग्णांची सेवा करत आहे.

रूपा प्रवीण राव या गजानुरू गावात राहते आणि ९ महिन्यांची गर्भवती आहे. त्या जयाचमाराजेंद्र सरकारी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत आहेत. त्या दरोरोज रूग्णांची सेवा करण्यासाठी तीर्थहल्ली तालुक्यापर्यंत प्रवास करतात.

- Advertisement -

एका वृत्तएजन्सीशी बोलताना रूपा म्हणाल्या, हे तालुका हॉस्पिटलच्या आजूबाजूला अनेक गावं आहेत. आणि आताया परिस्थितीत लोकांना आमची गरज आहे. माझ्या सिनीयरने मला सुट्टी घेण्यास सांगितले होते मात्र मला लोकांची मदत करायची आहे. मी दररोज सहा तास रूग्णांची सेवा करते. पुढे रूपा म्हणाली, राज्याचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी देखील मला फोन केला होता. माझे अभिनंदन केले आणि मला आराम करण्याचा सल्ला दिला.

रूपा प्रवीण राव या त्यांच्यापैकी एक आहेत जे सध्या आपले आयुष्य धोक्यात टाकून कोरोनाशी लढत आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – नोकरी नाही, मायदेशी येण्यासाठी मार्ग नाही.. अमेरिकेतील भारतीय संकटात!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -