घरमनोरंजन'यदाकदाचित रिटर्न्स'

‘यदाकदाचित रिटर्न्स’

Subscribe

नव्याने येणाऱ्या या नाटकात काही बदल करण्यात आले आहेत. 'यदाकदाचित' रिटर्न हे नाटक काहीसं वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

२० वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या ‘यदाकदाचित’ या नाटकाने प्रेक्षकांना वेड लावले होते. सुमारे चार हजार प्रयोग या नाटाकचे झाले. लेखक, दिग्दर्शक व अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेल्या संतोष पवार आणि टीमने रंगभूमीवर धुमाकूळ घातला होता. या नाटाकाला प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद बघता २० वर्षांनंतर संतोष पवार ‘यदाकदाचित रिटर्न्स’ हे नवीन नाटक घेऊन रंगभूमीवर येत आहेत. ‘श्री दत्त्तविजय प्रोडक्शन’ ने या नाटकाची निर्मीती केली आहे. १८ मेला ‘यदाकदाचित रिटर्न्स’ या नाटकाचा शुभारंभ प्रयोग पनवेलमध्ये होणार आहे.

नाटकाचे लेखन, दिग्दर्शन व गीते संतोष पवार यांनी लिहीली आहेत. अजय पुजारी यांनी नेपथ्याची जबाबदारी सांभाळली आहे. तर चेतन पडवळ यांनी नाटकाची प्रकाशयोजनेच काम केलं आहे. या नाटकात ताज्या दमाचे तब्बल १६ कलाकार भूमिका साकारत आहेत. या नाटकाची तालीम सध्या जोरात सुरु आहे. २००० साली एका एकांकिकेवरून या नाटकाची निर्मीती करण्यात आली होती. नव्याने येणाऱ्या या नाटकात काही बदल करण्यात आले आहेत. ‘यदाकदाचित’ रिटर्न हे नाटक काहीसं वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. कोणतीही पौराणीक पात्र नाटकात नसतील. या नाटकात नवीन चेहरे दिसणार आहेत. पुन्हा एकदा हे नाटक रंगभूमीवर धूमाकूळ सज्ज झालं आहे.

- Advertisement -

मी २० वर्षांपूर्वी ‘यदाकदाचित’ हे नाटक केले. बरीच वर्षे ते नाटक चालले. पण काही कारणांमुळे ते आम्हाला बंद करावे लागले. परंतु, तेव्हापासूनच या नाटकासंबंधी काहीतरी नव्याने करायचे माझ्या मनात पक्के होते. त्यासाठी आता २० वर्षे जावी लागली असली, तरी मोठ्या उत्सहात मी आता ‘यदाकदाचित रिटर्न्स’ हे नाटक करत आहे. रसिकांनी जसा ‘यदाकदाचित’ला पाठिंबा दिला, तसाच ‘यदाकदाचित रिटर्न्स’लाही त्यांचा प्रतिसाद मिळेल याची मला खात्री आहे.
संतोष पवार (लेखक, दिग्दर्शक)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -