घरमनोरंजनशाहरुख म्हणणार सारे जहाँ से अच्छा

शाहरुख म्हणणार सारे जहाँ से अच्छा

Subscribe

शाहरूख आता भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्माच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं नाव 'सारे जहाँ से अच्छा' असं निश्चित करण्यात आलं असून यामध्ये भूमी पेडणेकरचीही महत्त्वाची आहे.

भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा आता शाहरूखच्या रुपाने प्रेक्षकांसमोर येणार आहे. राकेश शर्माच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची बर्‍याच महिन्यांपासून चर्चा आहे. मात्र याचे नाव ‘सॅल्यूट’ असे ठेवण्यात आल्याचे याआधी समोर आले होते. पण आता ‘सारे जहाँ से अच्छा’ असं या चित्रपटाचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. राकेश शर्माची भूमिका शाहरूख खान साकारणार असून यामध्ये पहिल्यांदाच शाहरूखबरोबर अभिनेत्री भूमी पेडणेकर दिसणार आहे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन भोपाल एक्प्रेस फेम महेश मथाई करणार आहेत. याशिवाय या चित्रपटाची कथा ही अंजुम राजाबाली यांनी लिहिली आहे. यापूर्वी ‘लेजंड ऑफ भगत सिंह’ आणि ‘राजनीती’ या दोन्ही चित्रपटांच्या कथा अंजुम राजाबाली यांनी लिहिल्या होत्या आणि हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले होते.

पुढच्या वर्षी होणार प्रदर्शित

प्रसिद्ध निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. यावर्षाच्या शेवटी साधारणतः या चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टची घोषणा होण्याचा अंदाज आहे. तर याशिवाय फेब्रुवारीमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल असंही म्हटलं जात आहे. त्यामुळे शाहरूखचा हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी पुढचं वर्ष उजाडणार आहे. त्यामुळे शाहरूखच्या चाहत्यांना संपूर्ण वर्षभर त्याच्या चित्रपटासाठी वाट पाहावी लागणार आहे. असं असलं तरीही यावर्षाच्या शेवटीही शाहरूखचा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

- Advertisement -

यावर्षी ख्रिसमसला होणार झिरो प्रदर्शित

दरम्यान शाहरूखचा मोस्ट अवेटेड झिरो यावर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शाहरूखबरोबर अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असतील. तर शाहरूखचा यावर्षी केवळ एकच चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटात सलमान खाननेदेखील कॅमिओ केलेला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -