घरमनोरंजनशिल्पा आणि राज कुंद्राच्या उपद्व्यापामुळे शमिता शेट्टीला होतोयं ताप

शिल्पा आणि राज कुंद्राच्या उपद्व्यापामुळे शमिता शेट्टीला होतोयं ताप

Subscribe

शमिता अनेकदा बिग बॉसच्या घरात एकटीच वावरताना दिसते.

छोट्या पडद्यावर यंदा ‘बिग बॉस ओटीटी'(Bigg Boss OTT) या रियालिटी शोची धमाकेदार सुरुवात झाली असून शो मधील स्पर्धकांच्या चर्चा देखील आता सोशल मीडियावर चांगल्याच रंगत आहेत. प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे हा सिझन ‘ओवर द टॉप’ होतांना दिसत आहे. नुकतच शो मध्ये प्रसिद्ध होस्ट करण जोहरने (Karan Johar) हजेरी लावली होती. ‘संडे का वार’ या खास एपिसोड अंतर्गत करणने घरातल्या सर्व स्पर्धंकाची चांगलीच हजेरी लावली. याचदरम्यान करणने स्पर्धक शमित शेट्टीचे (Shamita Shetty) प्रचंड कौतुक केलं आहे. तसेच शमिताला काही प्रश्न देखील विचारले. शमिता अनेकदा बिग बॉसच्या घरात एकटीच वावरताना दिसते. या संबधीतच करणने तिला विचारले की, तुझ्या मनावर काही ताण आहे का?, तू घरात एकटीच वावरताना दिसतेय. करणचे शब्द ऐकताच शमिताला रडू कोसळले.(Shamita Shetty is suffering in industry due to the Shilpa and Raj Kundra)

काय म्हणाली शमिता

शमिता करणच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाली, “गेल्या 20-21 वर्षापासून मी सिनेसृष्टीत काम करत आहे. पण हा प्रवास खूपच खडतर ठरला. इतकी वर्ष मी माझ्या बहिणीच्या सावली मागे काढली. मी स्वत:ला त्याबद्दल खूप नशिबवान समजते. मला तिच्या छायेत खूप सुरक्षित वाटते. मला लोकं आजतागयत फक्त शिल्पा शेट्टीची बहिण म्हणूनच ओळखतात. त्यांना मी कोण आहे हे ठाऊक नाही. यामुळे मला कुठे तरी या गोष्टीची खंत वाटते. स्वत:ची ओळख तयार करण्यासाठी मला आजही प्रचंड स्ट्रगल करावं लागत आहे. ” शमिताची व्यथा ऐकून करण तिचा आत्मविश्वास वाढवत म्हणला , आता लोकं हळू – हळू खऱ्या शमिताला ओळखत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voot (@voot)

- Advertisement -


अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पति राज कुंद्राला ( Raj Kundra) पॉर्नोग्राफी सिनेमा चित्रीकरण तसेच निर्मीती केल्याबद्दल मुंबईतील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर अनेक लोकांनी सोशल मीडियावर शमिताला ट्रोल करण्यास सुरूवात केली होती. शिल्पा आणि राज कुंद्रा यांच्या उपद्व्यापामुळे आता शमिताला देखील नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.


हे हि वाचा – आलियाने केलं एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्राचं कौतुक म्हणाली, तू खूप खास आहेस…

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -