घरमनोरंजनचौकशी दरम्यान शिल्पाला कोसळले रडू, संतापाच्या भरात राज कुंद्राला म्हणाली हे तू...

चौकशी दरम्यान शिल्पाला कोसळले रडू, संतापाच्या भरात राज कुंद्राला म्हणाली हे तू का केलंस?

Subscribe

पॉर्नोग्राफी केसमध्ये अत्रिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक झाल्यापासून शिल्पा आणि राज दोघेही चर्चेचा विषय बनले आहेत. सध्या राज कुंद्रा पोलिसांच्या ताब्यात असून त्याला न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली. राजच्या व्हॉट्सॲप चॅट, फोन आणि साक्षीदारांची चौकशी केली असता राजच्या अडचणीत वाढ होत असल्याचे दिसत आहे. तसेच केस संबधीत राजची पत्नी शिल्पा शेट्टीला पोलिस चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. या चौकशी दरम्यान अधिकारी राज कुंद्रला देखील सोबत घेऊन गेले होते या वेळी शिल्पाने राजला पाहिल्यावर तिचा राग अनावर झाला आणि तिला रडू कोसळले मग ती म्हणाली हे सर्व तू का केलंस? या प्रकरणामुळे आपली किती बदनामी झाली? माहितीनुसार जेव्हा गुन्हे शाखेचे अधिकारी राजला घेऊन पुढील तपासाकरीता जुहू येथील शिल्पाच्या घरी पोहोचले तेव्हा शिल्पा राजला पाहून रागाने ओरडू लागली तसेच शिल्पा पुढे म्हणाली या प्रकरणामुळे आपल्या कुटूंबाची फार बदनामी झाली आहे तसेच अनेक एंडोर्समेंट,बिझनेस डील्स हातातून निसटल्या आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की,आम्ही शिल्पाची कसून चौकशी करत आहोत सद्या शिल्पाचा या प्रकरणाशी काहीही संबध नसल्याचे समोर आले आहे. तसेच यादरम्यान राज कुंद्राला अटक केल्यापासून शिल्पा राजच्या पाठिशी उभी आहे. माझा पती निर्दोष असल्याचे शिल्पाने चौकशीदरम्यान दरम्यान अनेकदा सांगितले.

- Advertisement -

हे हि वाचा –  ‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’ गाण्याने संध्या -प्रनिकेतने लावले नेटकऱ्यांना वेड

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -