घरमनोरंजन'ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’ गाण्याने संध्या -प्रनिकेतने लावले नेटकऱ्यांना वेड

‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’ गाण्याने संध्या -प्रनिकेतने लावले नेटकऱ्यांना वेड

Subscribe

ओ शेठ तुम्ही नादच केलाय ग्रेट’ या गाण्याच्या राइट्साठी अनेक नामांकित कंपन्याकडून संध्या आणि प्रनिकेत यांना ऑफर येत आहेत.

 

सोशल मीडिया म्हंटल की कोणतीही गोष्ट कधी क्षणार्धात व्हायरल होईल याचा पत्ता नाही. सध्या इंटरनेटवर ‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’ हे गाणं प्रचंड व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर तर रील बनवणाऱ्या नेटकऱ्यांनी तर या गाण्याला चांगलीच दाद दिली आहे. अशाचत या व्हायरल होणाऱ्या प्रसिद्ध गाण्याला नाशिकच्या संध्या केशे यांनी संगीत दिले आहे. या धमाकेदार गाण्याच्या माध्यमातून संध्या प्रसिद्धी झोतात आली आहे. सोशल मीडियावर ‘ओ शेठ’ या वाक्याने गेले काही दिवसापासून धुमाकूळ घातला होता. प्रत्येकाच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा चॅटींगमध्ये या वाक्याच सर्रास वापर केला जायाचा. फक्त एका शब्दावर अवघ्या अडीच तासात संध्याने हे गाणे लिहले आहे. तसेच प्रणिकेत खुने याचा सुद्धा महत्वपुर्ण सहभाग असून दोघांनी मिळून सर्वांन या गाण्याने वेड लावले असे म्हणायला हरकत नाही.

- Advertisement -

फक्त इंस्टाग्राम रिल्स नाही तर या गाण्यावर अनेक मीम्स मेकरने मजेशीर मीम तयार केले असून ते सुद्धा चांगलेच पसंतीस उतरत आहे. गेल्या महिन्यात पेट्रोलच्या दरात वाढ झाल्याने पंतप्रधान मोदींचा फोटो आणि हे गाणे एकत्र करुन मीम्स तयार करण्यात आले होते तसेच नेटकऱ्यांनी याला भरपूर प्रतिसाद दिला होता. एकंदरीत सध्या सोशल मीडियावर ‘ओ शेठ’ या गाण्याने नादच केलाय थेट असे म्हणावे लागेल.

- Advertisement -

‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’ या गाण्याच्या राइट्साठी अनेक नामांकित कंपन्याकडून संध्या आणि प्रनिकेत यांना ऑफर येत आहेत. सध्या हे गाण ऑडिओ स्वरुपात असून या गाण्याला व्हिडिओमध्ये रुपांतर करण्यासाठी कंपनीच्या रांगा लागल्या असल्याचे संध्या आणि प्रनिकेत यांच्या कडून बोलण्यात येत आहे.


हे हि वाचा – ‘मेडल जिंकल्याने मीराबाई भारतीय, अन्यथा चिंकी, चाईनीज, कोरोना म्हटले असते,’…

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -