घरमनोरंजन'शिवानीच्या' हातावर रंगला 'विराजस' मेहंदीचा रंग !

‘शिवानीच्या’ हातावर रंगला ‘विराजस’ मेहंदीचा रंग !

Subscribe

शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी यांची लग्न गाठ

अभिनेत्री शिवानी रंगोळे आणि अभिनेता, दिग्दर्शक विराजस कुलकर्णी हे बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. तसेच ते दोघे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना सुद्धा दिसतात. मराठी सिने विश्वातील ही लोकप्रिय जोडी लग्नबंधनात केव्हा अडकणार याची उत्सुकता असतानाच त्या दोघांसंबंधी एक आनंदाची बातमी समोर आलीय शिवानी आणि विराजस यांच्या लग्नाची चर्चा गेले अनेक दिवस सुरु होती.

आणि अखेर ते दोघंही लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नविधीला सुद्धा सुरुवात झालीये. शिवानीने तिच्या सोशल मीडिया अकांऊट वरून तिचे मेहंदीचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. आणि त्यात ती खखूप सुंदर दिसते आहे. शिवानीने तिच्या मेहंदी साठी हिरव्या रंगाचा काठपदरी साडीच्या नक्षीने तयार केला ड्रेस परिधान केला आहे. अत्यंत पारंपरिक ड्रेस आणि त्या सोबतच तिने चढवलेले दागिने तिच्या सौंदर्यात अधिक भर घालतायेत.मेहंदीच्या या सोहळ्यापासून त्या दोघांच्या लग्न सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या दोघांवरही त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एक अभिनेत्री म्हणून शिवानीने या पूर्वी काही मालिकांमधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. तर विराजास सुद्धा एक अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून उत्तम काम करतोय. पती- पत्नी म्हणून शिवानी आणि विराजस त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहेत.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -