घरमनोरंजनSidharth Shukla death: सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक एक्झिटमुळे बॉलिवूड कलाकारांना अश्रू अनावर, सना...

Sidharth Shukla death: सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक एक्झिटमुळे बॉलिवूड कलाकारांना अश्रू अनावर, सना खानच्या भावनांचा फुटला बांध

Subscribe

छोट्या पडद्यापासून ते अगदी बॉलिवूड विश्वापर्यंतचा लोकप्रिय असलेला अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तो अवघ्या ४० वर्षांचा होता. सिद्धार्थच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळे बॉलिवूड कलाकारांना अश्रू अनावर झालेत. तर अनेकांना या घटनेवर विश्वास ठेवणेही अवघड होतेय. मुंबईतील कपूर रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थच्या निधनाच्या बातमीमुळे चाहत्यांना तसंच अनेक सेलिब्रिटींना धक्का बसला आहे. सोशल मीडियावरुनही आता संवेदना व्यक्त केल्या जात आहे. सिद्धार्थ मृत्यूमुळे त्याची मैत्रिण आणि अभिनेत्री सना खानच्या भावनांचा बांध फुटला.

सना खानच्या भावनांचा फुटला बांध

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर एका टीव्ही चॅनलशी बोलताना सना खान हीला अश्रू अनावर झाले. यावेळी बोलताना सना खान म्हणाली की, मी त्याला पर्सनली ओळखायचे. त्याच्याबद्दल मी काही चुकीचे तर ऐकत नाही ना, हे खूपचं शॉकिंग आहे. देव त्यांच्या कुटुंबियांना यातून सावरण्याची ताकद देवो. हे खूपचं चुकीचे झाले. ही बातमी पचवणं माझ्यासाठी खूप कठीणं आहे. मी गुगल करुन पाहिले की ज्या बातम्या येत आहेत त्या खरोखरंच आहेत का? खरंच अजूनही विश्वास बसत नाही, तो अतिशय चांगला माणूस होता.

- Advertisement -

राहुल महाजन म्हणाला.. तो अतिशय तंदुरुस्त होता पण…

राहुल महाजन याने देखील सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर दुख: व्यक्त केलं आहे. राहुल महाजन म्हणाला की, सिद्धार्थ एक अतिशय फिट आणि जबरदस्त व्यक्तिमत्व होते. त्याची बॉडी पाहून आम्हालाही वाटायचे त्याचा फिटनेस फॉलो करावा. राहुल पुढे सांगतो, सिद्धार्थ खूप अध्यात्मिक व्यक्ती होता. त्याने आईसाठी घर घेतले. तसेच त्याचे आर्थिक आणि व्यावसायिक कामं खूप चांगल्याप्रकारे सुरु होती. पण सिद्धार्थ थोडा कमी बोलणारा होता. तो आपल्या मनातील गोष्टी कधीच शेअर करत नव्हता. सिद्धार्थवर त्याचे आईचं खूप प्रेम होतं. मात्र तो एक बिधास्त आणि स्पष्ट बोलणारा व्यक्ती होता. पण तो या व्यतिरिक्त इतर काहीही सांगायचा नाही. राहुल सांगतो, सिद्धार्थ शाहरुख खानचा मोठा चाहता होता.

- Advertisement -

दिल से दिल तक आणि बिग बॉस मध्ये एकत्र काम केलेल्या अभिनेत्री रश्मी देसाईने Rashmi Desai त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. रश्मीने तुटलेल्या हृदय पोस्ट करत दुःख व्यक्त केलं आहे.

बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानने सिद्धार्थ निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. सलमान खान आणि सिद्धार्थ या दोघांचे नाते बिग बॉसमध्ये पाहायला मिळाले होते. सलमान खान ट्वीट करत म्हणाला की, ‘सिद्धार्थ खूप लवकर गेलास, तुझी आठवण येईल.’

सिद्धार्थ शुक्ला आत्तापर्यंत अनेक हिट टीव्ही शोमध्ये काम केले होते. बालिका वधु मालिकेतील त्याच्या शिवच्या भूमिकेमुळे तो प्रकाश झोतात आला. सिद्धार्थने बॉलिवूड चित्रपटामध्येही काम केले. अनेक प्रोजेक्टवर त्याचे काम सध्या सुरु होते. मात्र ऐन प्रसिद्धीच्या मोक्यावर सिद्धार्थने बॉलिवूडमधून अचानक एक्झिट घेतली.


siddharth shukla death: सिद्धार्थच्या आकस्मिक मृत्यूने मैत्रीण शहनाज गिलला मानसिक धक्का


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -