घरट्रेंडिंगsiddharth shukla death: सिद्धार्थच्या आकस्मिक मृत्यूने मैत्रीण शहनाज गिलला मानसिक धक्का

siddharth shukla death: सिद्धार्थच्या आकस्मिक मृत्यूने मैत्रीण शहनाज गिलला मानसिक धक्का

Subscribe

बिग बॉस (Bigg Boss) फेम  अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झालं आहे (siddharth shukla death). हृदयविकाराच्या झटक्यामुळे सिद्धार्थने वयाच्या ४०व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला आहे. या घटनेनंतर संपूर्ण मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली असून अद्याप सिद्धार्थच्या मृत्यूचे नेमकं कारण उघडकीस आलं नाहीये. मात्र सिद्धार्थच्या अचानक एक्जिटमुळे अभिनेत्री शहनाज गिलला(shehnaaz gill)एपलो प्रचंड मोठ्ठा मानसिक धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे.(Siddharth Shukla sudden death his girlfriend Shahnaz Gill shocked)

बिग बॉसच्या घरात शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांची क्रेमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच भावली होती. पहिल्यांदा बिग बॉसमध्ये दोघांची भेट होऊनही दोघांचे नाते इतके घट्ट झाले होते की त्यांच्यामध्ये होणाऱ्या वाद-विवाद, प्रेम,रुसणं -फुगणं याची चर्चा बिग बॉसच्या घराबाहे व्हायरल होत असे. बिग बॉसच्या घरात असताना सोशल मीडियावर दोघांच्या नावाचे अनेक फॅन पेजेस देखील चाहत्यांने तयार केले होते. #sidnazz या लोकप्रिय नावाने टॅग देखील तयार केले होते. सिद्धार्थ बिग बॉसचा विजेता झाल्यावर देखील शेहनाज आणि त्याची जोडी चाहत्यामध्ये इतकी लोकप्रिय झाली की अनेक म्यूझिक व्हिडिओमध्ये काम करण्याची ऑफर त्यांना येऊ लागली. इतकंच नाही तर त्यांची प्रत्येक गाणी हिट ठरत असून सर्व गाण्यावर मिलीयन व्ह्यूव्स मिळत असे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

- Advertisement -

सिद्धार्थ शुक्ला आपल्या व्यक्तीगत तसेच व्यावसायिक जीवनातील घडामोडी सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यासोबत शेअर करत असायचा. तसेच त्याचे इंस्टाग्रामवर 3.6 मीलियन फॉलोवर्स होते. बिग बॉसचा 13 वा सिझन शेहनाज गिल आणि सिद्धार्थ यांच्यामुळे प्रचंड गाजला होता आणि यानंतर सिद्धार्थच्या फिल्मी करीयर चमकू लागले. बिग बॉस नंतर सिद्धार्थने कधीच मागे वळून पाहिले नाही.

- Advertisement -

बिग बॉस व्यतीरिक्त सिद्धार्थने फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 7 देखील जिंकले होते. सिद्धार्थ शुक्लाचा जन्म 12 डिसेंबर 1980 रोजी झाला होता, तो 40 वर्षांचा होता.इतक्या कमी वयात सिद्धार्थने जगाचा निरोप घेतल्याने सर्व स्तरावरुन हळहळ व्यक्त केली जात आहे.


हे हि वाचा – siddharth shukla death: बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाचे निधन

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -