घरमनोरंजनसिम्बा बॉक्स ऑफिसवर सुपरहीट; १३२ कोटीची कमाई

सिम्बा बॉक्स ऑफिसवर सुपरहीट; १३२ कोटीची कमाई

Subscribe

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी १८ कोटींची कमाई करु शकेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र हा अंदाज खोटा ठरला असून या चित्रपटाने प्रदर्शनानंतर अवघ्या काही तासातच २० कोटींची कमाई केली.

रोहित शेट्टीचा सिम्बा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला असून या चित्रपटाने १३२ कोटींची कमाई केली आहे. रणवीर सिंह आणि सारा अली खान यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी कुटुंबासह लोकं येत आहेत. या चित्रपटाने फक्त भारतात नाही तर विदेशातही चांगली कमाई केली आहे. सिंबाने पहिल्यांच विकेंडमध्ये १०० कोटीची कमाई केली. पद्मावतनंतर सिम्बा हा रणवीर सिंगचा १०० कोटींचा टप्पा ओलंडणारा हा दुसरा चित्रपट आहे.

१३२ कोटींची कमाई 

सिम्बा चित्रपटाचा बजेट जवळपास ८० कोटींच्या आसपासचा आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी १८ कोटींची कमाई करु शकेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र हा अंदाज खोटा ठरला असून या चित्रपटाने प्रदर्शनानंतर अवघ्या काही तासातच २० कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने २३ करोड ३३ लाख रुपयांची कमाई केली. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ३१ कोटी २ लखांची कमाई केली. तर चौथ्या दिवशी या चित्रपटाने २१ कोटींची कमाई केली. असे मिळून या चित्रपटाने एकूण ९५ कोटी ५० लाखाची कमाई केली. त्यानंतर या चित्रपटाने आता थेट १३२ कोटींची कमाई केली आहे.

- Advertisement -

मुंबईत सर्वात जास्त कमाई 

या चित्रपटाने मुंबईत केलीली कमाई पाहिली तर शुक्रवारी ७ कोटी ७७ लाखांची कमाई केली. शनिवारी ९ कोटी ११ लाख, रविवारी १३ कोटी १३ लाखंची कमाई केली. एकूण मिळून या चित्रपटाने फक्त मुंईत १२ कोटी १३ लाखांची कमाई केली. दरम्यान बॉक्स ऑफिसवर सिंबासोबत दुसरा कोणताही चित्रपट रिलीज झाला नाही. त्यामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे.

सिम्बा चित्रपट लीक 

‘आला रे आला सिम्बा’ म्हणत रणवीर सिंह आणि सारा अली खानचा ‘सिम्बा’ हा चित्रपट रिलीज होऊन काही तास उलटत नाही तोच हा चित्रपट लीक झाल्याचे समोर आले. पण यंदा हा सिनेमा तामिळ रॉकर्सनी लीक केला नाही तर चक्क अक्षय कुमारच्या फॅन्सनी लीक केला आहे. कारण त्यांनीच या चित्रपटातील एक रहस्य सोशल मीडियावर शेअर केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

‘सिम्बा’ प्रेक्षकांमध्ये हिट

‘सिम्बा’ सिनेमा लीक?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -