घरमहाराष्ट्रपुण्यातील मोदी मंदिर हटवलं; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महागाई कमी करण्यासाठी घालणार होते साकडं

पुण्यातील मोदी मंदिर हटवलं; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महागाई कमी करण्यासाठी घालणार होते साकडं

Subscribe

पुण्यातील औंधमध्ये उभारण्यात आलेलं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi Temple) यांचं मंदिर हटवण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर ही मूर्ती हटवण्यात आली आहे. या मंदिरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा शेजारील नगरसेवकीच्या कार्यालयात हलविण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नमो प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर मुंडे यांनी औंध भागातील परिहार चौकात मोदी मंदिराची उभारणी केली होती. या मंदिराची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गुरुवारी सकाळी मोदी मंदिराजवळ दाखल झाले होते. पेट्रोल-डिझेलचे वाढते, घरगुती गॅस सिलिंडर, वाढती महागाई कमी करण्यासाठी या मोदी मंदिराकडे साकडं घालायला आलो होतो, असं या कार्यकर्त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

‘देशापुढे असलेले प्रश्न सुटावेत यासाठी आम्ही साकडं घालायला मंदिरात आलो होतो. मात्र भाजपचा देव काही केल्या आम्हाला दिसत नाही आहे. पेट्रोल, डिझेल, सिलिंडरचे दर कमी होऊ दे, यासाठी नवस बोलायला आम्ही इथे आलो. पण देवच दिसत नसल्यानं आम्हाला अगदी भरून आलं,’ अशी टोलेबाजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. देव चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पुण्यातील औंध भागामधील मयूर मुंढे या भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतःची मालकी असलेल्या जागेत हे मंदिर उभारले होते. पिंपरी चिंचवड येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांनी खास जयपूरमधून मोदींचा पुतळा तयार करुन घेतला आहे. याकरिता १ लाख ६० हजार रुपये खर्च आलेला. १५ ऑगस्ट २०२१ दिवशी औंधमधील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले होते.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -