घरदेश-विदेशएक जोडी कपड्यावर सोडला देश, परतीचा मार्ग शोधतोय, अशरफ घनींची भावनिक पोस्ट

एक जोडी कपड्यावर सोडला देश, परतीचा मार्ग शोधतोय, अशरफ घनींची भावनिक पोस्ट

Subscribe

तालिबानने अफगाणिस्तानच्या काबुलपर्यंत सत्ता काबीज करताच अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडून पलायन केले. मात्र देशाबाहेर पलायन करताना अशरफ घनी यांनी चार कार आणि हेलिकॉप्टर भरून पैसासोबत नेला. हेलिकॉप्टरमध्ये पैसा ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे नाईलाजाने त्यांनी काही रक्कम मागे सोडल्यासह अनेक आरोप केले जात आहेत.

मात्र राष्ट्रपती अशरफ घनी यांनी अफगाणिस्तानमधून पैसा घेऊन पळून गेल्याचे त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. अशरफ घनी यांना एका नवा व्हिडिओ पोस्ट करत यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. अशरफ घनी यांनी सांगितले की, मी फक्त एक जोडी कपड्यांसह अफगाणिस्तान सोडला. फेसबुकवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये घनी यांनी अफगाण जनतेला भावनिक साद घातली आहे.

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये घनी सांगतात. माझा देशातून पळून जाण्याचा किंवा मायभूमी अफगाणला सोडण्याचा कोणताही हेतू नव्हता. मी रक्तरंजित लढाई थांबण्यासाठी संयुक्त अरब अमिरात आहे. मी अजूनही अफगाणिस्तानमध्ये परत जाण्याचा मार्ग शोधतोय. मी न्याय, अफगाणाचे सार्वभौमत्व आणि खरोखर इस्लामिक मूल्यांना पुर्नजीवित करण्यासाठी लढाई लढत राहीन.

अफगाणिस्तान सोडल्यानंतर अशरफ घनी यांनी संयुक्त अरब अमिरातमध्ये आश्रय घेतला आहे. युएई परराष्ट्र मंत्रालयाने अशरफ घनी त्यांच्या कुटुंबियांसह अरब अमिरातमध्ये असल्याची अधिकृत घोषणा केली. यूएई सरकारच्या म्हणण्यानुसार, घनी आणि त्यांचा कुटुंबियांना मानवी आधारावर आश्रय देण्यात आला आहे.

- Advertisement -

अशरफ घगी देश सोडून जाण्यामागे काहीही कारण असले तरी वास्तविकता अशी आहे की, आता अफगाणिस्तानची परिस्थिती आत्तापूर्णपणे बदलली आहे. त्यामुळे अफगाणिस्तान पुन्हा होत्या पूर्वीच्या स्थितीत केव्हा येईल असा प्रश्न आहे. यात अफगाणिस्तानचे नवे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी स्वत:ला नवे राष्ट्रपती म्हणून घोषित केले.
ताजिकिस्तानमधील अफगाणी दूतावासाच्या आतील अशरफ घनी यांच्या जागी राष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांचा फोटो दिसतोय.

सालेह यांनी तालिबानसमोर शस्त्र डागण्यास साफ नकार दिला आहे. त्यामुळे काबुलवर तालिबानने कब्जा केल्यानंतरही ना त्यांनी देश सोडला ना ही संघर्षासाठी धडपड केली. यातच अफगाणिस्तानचे संरक्षणमंत्री बिस्मिल्ला खान यांनी ट्विट करत इंटरपोलसमोर मागणी केली की, अशरफ घनी यांना अटक करा. त्यांनी आपली मातृभूमी विकत देशातून पळून जाण्याचे काम केले.


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -