घरमनोरंजन'या' दिवशी प्रदर्शित होणार सामाजिक चित्रपट 'मसुटा'

‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सामाजिक चित्रपट ‘मसुटा’

Subscribe

आज मराठीमध्ये वेगवेगळ्या विषयांवरील निरनिराळ्या धाटणीचे चित्रपट बनत आहेत. असाच एक वेगळ्या वाटेनं जाणारा ‘मसुटा’ असं शीर्षक असलेला मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सामाजिक मनोरंजक सिनेमाच्या व्याख्येत अचूक बसणारा ‘मसुटा’ हा चित्रपट २४ फेब्रुवारी २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. या चित्रपटाद्वारे मराठी रसिकांसमोर एक आगळी वेगळी कथा येणार आहे.

काशिबाई फिल्म्स प्रोडक्शन आणि साईसागर प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘मसुटा’ या चित्रपटाची निर्मिती भरत मोरे आणि मनेश लोढा यांनी केली आहे. अजित देवळे आणि सुनील शिंदे या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्युसर्स आहेत. अजित देवळे यांनीच ‘मसुटा’चं दिग्दर्शन आणि संकलनही केलं आहे. ‘मसुटा’ हा चित्रपट म्हणजे जगण्यासाठी धडपड करणारी जगावेगळी कर्मकहाणी आहे. यात समाजातील एका विशिष्ट वर्गातील मनाला भिडणारी कथा पहायला मिळेल. या चित्रपटाच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेशही देण्यात आले आहेत. दिग्दर्शक अजित देवळे यांनी हे सर्व आपल्या अनोख्या दिग्दर्शनशैलीद्वारे मनोरंजक करण्याचं काम केलं आहे. या चित्रपटानं आजवर देश-विदेशांतील बऱ्याच सिने महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवला आहे.

- Advertisement -

‘मसुटा’चं पटकथा लेखन भरत मोरे यांनी केलं असून, अनिल राऊत यांनी संवाद लिहिले आहेत. अनंत जोग, नागेश भोसले, हृदयनाथ राणे, रियाझ मुलाणी, अर्चना महादेव, वैशाली केंडाळे, कांचन पगारे, यश मोरे आदी कलाकारांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. गीतरचना आणि संगीत अविनाश पाटील व सुनील म्हात्रे यांचं आहे. आदर्श शिंदे, अबोली गिऱ्हे, अविनाश पाटील यांनी या चित्रपटासाठी गायन केलं असून कॅास्च्युम डिझाईन चैत्राली डोंगरे यांनी केलं आहे. डिओपी दिलशाद व्ही. ए. यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, पार्श्वसंगीत पिनाकी रॅाय यांनी केलं आहे. बॉक्स हिट मूव्हीज या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळणार आहे.

 


हेही वाचा :

त्याला माहीत नाही… कंगनाने साधला आमीर खानवर निशाणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -