घरताज्या घडामोडीव्हॅलेन्टाईन्स डे निमित्त पार्ल्यात "रोमँटिक सुरोंकी मैफिल"

व्हॅलेन्टाईन्स डे निमित्त पार्ल्यात “रोमँटिक सुरोंकी मैफिल”

Subscribe

विले - पार्ले पूर्व येथे 'सूर-ताल कराओके क्लब'ने खास पार्लेकर संगीतप्रेमी रसिकांसाठी रोमँटीक गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता.

मुंबईत सध्या गुलाबी थंडी पसरलेली असताना अनेक ठिकाणी ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ निमित्त रोमॅंटीक गाण्यांचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. विले – पार्ले पूर्व येथे ‘सूर-ताल कराओके क्लब’ने खास पार्लेकर संगीतप्रेमी रसिकांसाठी रोमँटीक गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. विले – पार्ले पूर्व येथील साठे महाविद्यालयाच्या सभागृहात, शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला.

प्रेमाची वेगवेगळी रूपे आपल्याला अनेक जून्या चित्रपटांतून पाहायला मिळतात. त्याच प्रमाणे प्रेक्षकांना भारावून टाकणारी जुनी बहारदार गाणी आजतागायत अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसतात. हाच अनमोल ठेवा जपत नव्या गायकांच्या मुखातून दर्दी रसिकांसाठी “रोमँटिक सुरोंकी मैफिल” हा कार्यक्रम पार्लेकरांसाठी आयोजित करण्यात आला होता. ‘व्हॅलेन्टाईन्स डे’चे निमित्त साधत नव्वदीच्या दशकातील रोमॅंटीक गाणी यावेळी सादर करण्यात आली.

- Advertisement -

आजच्या तरूणाईमध्ये जुन्या गाण्यांची गोडी निर्माण व्हावी’, हा मुख्य उद्देश असल्याचे ‘सूर-ताल कराओके क्लब’चे फाऊंडर महेश कळेकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमात चाळीसपेक्षा जास्त वय असलेल्या गायकांचा सहभाग होता. ‘कलेला कोणतेही वय नसते’ हे याबबतीत खरे झाल्याचे दिसून येते. ‘आपल्या आयुष्यात प्रत्येकाला त्याची आवड जोपासावी असं वाटते, या निमित्ताने लोकांशी बोलून उत्साह मिळतो’ असे ८२ वर्षाचे सुरेश पुरे यांनी सांगितले आहे. असे अनेक नवोदित कलाकार ज्यांनी कधीही गाणे शिकले नाही अशा अनेक कलाकारांनी आपल्या आवाजाने या कार्यक्रमातून प्रेक्षकांची मने जिंकली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -