घरमनोरंजनदाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी कोरोना पॉझीटीव्ह

दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी कोरोना पॉझीटीव्ह

Subscribe

बॉलीवूडबरोबरच टॉलीवूडमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी याला कोरोनाची लागण झाली आहे. याबद्दल चिरंजीवीने टि्वट केले आहे. त्यात त्याने खूप काळजी घेऊनही मी कोरोना पॉझीटीव्ह आल्याचे सांगितले आहे. तसेच मला सौम्य लक्षणे असून मी गृहविलगीकरणात असल्याचे त्याने टि्वटमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया आपली कोरोना टेस्ट करावी असेही त्याने म्हटले असून लवकरच सर्वांना भेटेन असेही चिरंजीवी म्हणाला आहे.

चिरंजीवीने कोरोनाची लागण झाल्याचे सांगितल्यानंतर अनेक कलाकारांनी त्याला लवकर बरे होण्याचा आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. अभिनेता ज्युनियर एनटीआऱ यानेही सर लवकर बरे व्हा असे टि्वट केले आहे.
चिरंजीवीला २०२० मध्ये कोरोनाची लागण झाली होती. पण तीन दिवसांनी चिरंजीवीने तो चुकीचा रिपोर्ट असल्याचे म्हटले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -