घरमनोरंजन'या' साऊथच्या अभिनेत्रीला देवीप्रमाणे पूजतात चाहते; एक नव्हे तब्बल तीन मंदिरं

‘या’ साऊथच्या अभिनेत्रीला देवीप्रमाणे पूजतात चाहते; एक नव्हे तब्बल तीन मंदिरं

Subscribe

या अभिनेत्रीला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मादक अभिनेत्री म्हणून देखील ओळखले जाते

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्र्यांची गणना नेहमी बोल्ड आणि सुंदर अभिनेत्र्यांमध्ये केली जाते. याच चित्रपटसृष्टीमध्ये सगळ्याच हॉट अभिनेत्रींपैकी तसेच मुळची सूरतची असलेल्य़ा नमिता वाकांवाला उर्फ भैरवी नेहमीच तिच्या अभिनय आणि बोल्ड अदांमुळे चर्चेत असते. तमिळनाडूच्या तिरूनलवेलीस्थित एका मंदिरामध्ये नमिताची पहिली मुर्ती स्थापना करण्यात आली आहे. साऊथमध्ये तसेच टॉलिवूडमध्ये या अभिनेत्रीचे प्रचंड चाहते असल्याने या अभिनेत्रीला साऊथमध्ये देवीप्रमाणे पुजलं जाते. म्हणून नमिता या अभिनेत्रीचे एक नव्हे तब्बल तीन मंदिरं देखील बांधण्यात आली आहेत.

- Advertisement -

नमिता ही टॉलिवूडच नाही तर बॉलिवूडमधील सर्वात उंच अभिनेत्री असून या अभिनेत्रीची उंची सहा फूट आहे. साऊथ तसेच बॉलिवूडमधील सर्वात उंच अभिनेत्रींपैकी एक आहे. १९९८मध्ये ‘मिस सूरत’चा किताब नमिताने पटकावला होता. तर २००१ साली ती मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत रनरप राहिली होती.

- Advertisement -

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील नमिता प्रसिद्ध असल्याने तिच्या चाहत्याने तिचे अपहरण देखील केले होते. मात्र, त्याच्या या प्रयत्नाला यश आले नाही. ज्यावेळी पोलिसांनी अपहरणकर्त्याला यामागचे कारण विचारले असता त्याने नमिताचा मोठा चाहता असल्याचे सांगितले. मात्र, नमिताच्या सांगण्यावरून या अपहरणकर्त्याची सुटका करण्यात आली होती. ही अभिनेत्री दिसायला लठ्ठ असली तरी सर्वात हॉट अभिनेत्री नमिता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत ठरली.

View this post on Instagram

With The One! ? #wolfguard @veera.official

A post shared by Namitha (@namita.official) on

या अभिनेत्रीला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मादक अभिनेत्री म्हणून देखील ओळखले जाते. जगन मोहिनी, बिल्ला हे तिचे चित्रपट गाजले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -