घरताज्या घडामोडीSridevi Birthday Special: श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची खास लव्ह स्टोरी

Sridevi Birthday Special: श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची खास लव्ह स्टोरी

Subscribe

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी चित्रपटसृष्टीत ‘चांदनी’, ‘सदमा’, ‘चालबाज’, ‘मिस्टर इंडिया’, ‘इंग्लिश विग्लिंश’ यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. श्रीदेवी यांनी प्रत्येक भूमिकेचं सोनं केलं आणि त्यामुळे शेवटपर्यंत चाहत्यांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवलं. आज श्रीदेवी यांचा वाढदिवस आहे. १३ ऑगस्ट १९६३ रोजी तामिळनाडूत श्रीदेवींचा जन्म झाला होता. श्रीदेवी नेहमीच त्यांच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा लव्ह लाईफविषयी जास्त चर्चेत राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लव्ह स्टोरी काय होती हे जाणून घेणार आहोत.

प्रपोज करण्यापूर्वी केलं वजन कमी

- Advertisement -

श्रीदेवी यांचं खरं नाव श्री अम्मा यंगर अय्यपन होते. श्रीदेवी यांनी लहानपणापासूनच बाल कलाकर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १९७९ साली ‘सोलवा सावन’ या चित्रपटापासून त्यांनी हिंदीतून चित्रपटातील करिअरची सुरुवात केली. त्यानंतर १९८३ साली ‘हिम्मतवाल’ चित्रपटात त्यांनी काम केलं. ‘सोलवा सावन’मध्ये श्रीदेवी यांना पाहिल्यानंतर बोनी कपूर त्यांच्या प्रेमात पडले. एवढंच नाही तर ते श्रीदेवी यांचे खूप मोठे फॅन होते. श्रीदेवींना प्रपोज करण्यापूर्वी बोनी कपूर यांनी वजन कमी केलं. याबाबत खुलासा त्यांनी सलमान खानच्या रियलिटी शो ‘१० का दम’मध्ये केला होता. यावेळेस या शोमध्ये श्रीदेवी देखील उपस्थित होत्या.

बोनी कपूर श्रीदेवींच्या घराभोवती चकरा मारत असतं

- Advertisement -

एक दिवशी बोनी कपूर श्रीदेवींना भेटण्यासाठी चेन्नईतील त्यांच्या घरी गेले होते. पण त्यावेळेस त्या सिंगापूरमध्ये शूटसाठी गेल्या होत्या. यामुळे बोनी कपूर खूप अस्वस्थ झाले. यानंतर ते दररोज श्रीदेवींच्या बंगल्याभोवती चकरा मारतं असतं.

मिस्टर इंडियाच्या शूटिंग दरम्यान प्रेमाची झाली सुरुवात

‘मिस्टर इंडिया’ करण्यासाठी बोनी कपूर चेन्नईला श्रीदेवींना हा चित्रपट ऑफर करण्यासाठी गेले होते. श्रीदेवींना या चित्रपटाची कथा आवडली आणि त्यांनी चित्रपट करण्यास होकार दिला. १९८४ साली बोनी कपूर यांनी ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटात श्रीदेवींना सीमाची भूमिका ऑफर केली. इतकंच नाही तर बोनी कपूर यांनी श्रीदेवींसाठी खास वेगळी मेकअप रुमची व्यवस्था केली होती.

माहितीनुसार, श्रीदेवींच्या आईच्या आजारपणात आणि नंतर त्यांच्या मृत्यूदरम्यान या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. आईच्या निधनानंतर श्रीदेवी खूप एकाकी झाल्या आणि त्यावेळी बोनी कपूर त्यांचा आधार झाले होते. मग दोघांमधील प्रेम आणखीनच वाढले. यानंतर बोनी कपूर यांनी आठ वर्षांनी लहान असलेल्या श्रीदेवींना १९९३ साली प्रपोज केलं. जेव्हा बोनी कपूर श्रीदेवींच्या प्रेमात पडले तेव्हा त्याचं लग्न झालं होतं आणि त्यांना दोन मुलंही होती. पण श्रीदेवीशी लग्न करण्यासाठी त्यांनी पहिली पत्नी मोना कपूरशी घटस्फोट घेतला. त्यानंतर दोघांनी २ जून १९९६ रोजी लग्न केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -