घरमनोरंजन'स्टुडन्ट ऑफ दि इअर 2' Trailer Out!

‘स्टुडन्ट ऑफ दि इअर 2’ Trailer Out!

Subscribe

बॉलीवूडच्या सिक्वल लाटेमध्ये आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. नुकताच स्टुडन्ट ऑफ दि इअर या चित्रपटाच्या सिक्वलचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

बॉलीवूडच्या सिक्वल लाटेमध्ये आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. नुकताच स्टुडन्ट ऑफ दि इअर या चित्रपटाच्या सिक्वलचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. धर्मा प्रोडक्शनच्या या चित्रपटाची निर्मिती करण जोहर यांनी केली असून प्रमुख भूमिकेत टायगर श्रॉफ दिसणार आहे. तर तारा सुतारिया आणि अनन्या पांडे या दोन नवोदित अभिनेत्री या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. येत्या १० मे २०१९ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्पर्धेतील चढाओढ, कॉलेज लाईफ, प्रेमाचा त्रिकोण आणि जिंकण्याची जिद्द पुन्हा एकदा स्टुडन्ट ऑफ दि इअर २ मध्ये पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

वरुण, सिद्धार्थ आणि आलियाचं मॅजिक

यापूर्वी आलेल्या स्टुडन्ट ऑफ दि इअर चित्रपटामधून दिग्दर्शक डेविड धवन यांचा मुलगा वरुण धवन, दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्ट आणि फॅशन डिजायनर मनिष मल्होत्रा यांचा पुतण्या सिद्धार्थ यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. आता या तिघांचेही करिअर टॉपवर आहेत. आलिया आणि वरुणने तर बॉलीवूडच्या सुपरस्टार यादीत नाव नोंदवले आहे. आता स्टुडन्ट ऑफ दि इअर २ मधूनही स्टार किड्स प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे हिच्या लुक्सची चर्चा आधीच सुरु झाली असून तिच्या पदार्पणाबाबतही चाहते उत्सुक आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -