घरमनोरंजनसुहाना खानच्या Sheer टॉपची सोशल मीडियावर होतेय चर्चा !

सुहाना खानच्या Sheer टॉपची सोशल मीडियावर होतेय चर्चा !

Subscribe

सुहानाची सोशल मीडियावर भली मोठी फॅन फॉलोईंग असून ती नेहमीच अनेक फोटो तसेच व्हिडिओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.

बॉलिवूड(bollyeood) कलाकारांप्रमाणेच स्टारकिड्सची चर्चा सोशल मीडियावर जास्त प्रमाणात रंगत असते. बॉलिवूडचे किंग खान अर्थात शाहारूख खानची(Shahrukh khan) मुलगी सुहाना खान नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेचा विषय ठरते. मग ते तिचे फोटो असो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. या स्टारकिड्सच्या यादीत शाहरूख खानची मुलगी सुहाना खानचे(Suhana khan) नाव अग्रणी घेतले जाते. सोशल मिडीयावरील तिचे अपडेटेड राहणे, तसेच तिचे रोजच व्हायरल होणारे अनेक फोटो आणि व्हिडिओ यामुळे सुहाना नेहमीच चर्चेत असते सुहानाची सोशल मीडियावर भली मोठी फॅन फॉलोईंग असून ती नेहमीच अनेक फोटो तसेच व्हिडिओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर बड्या कलाकारांसह चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात. नुकतच सुहानाने पोस्ट केलेला एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सुहाना सुट्या एंजॉय करण्यासाठी गेली असता तिच्या सुट्यामधील शेवटाच दिवसाचा फोटो शेअर करत ‘last day’ लिहून सुट्टी संपली असल्याचे सांगितले आहे.(suhana khan share her photo in white sheer top)

या फोटोमध्ये सुहाना अत्यंत हॉट अवतारात दिसत आहे. सुहानाने ब्लॅक कलरची स्पेकिटी घातली असून त्यावर व्हाईट कलरचा ट्रांन्सफरंट sheer क्रॉप टॉप घातला आहे. यासोबतच तिने ब्लू डेनियाम शॉर्ट्स घातला आहे. सध्या सुहानाच्या या लूकची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. तसेच नेटकऱ्यांनी या फोटोला चांगलीच पसंती दर्शवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

- Advertisement -

गेल्या काही दिवासापासून सुहाना व्हॅकेशनचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करताना दिसत आहे. बुधवारी सुहानाने अत्यंत सुंदर असा लाल कलरचा बॉडीकॉन ड्रेस घातला होता. मात्र या सर्व फोटोमध्ये सुहानाने ती कोणत्या ठिकाणी सुट्ट्या एंजॉय करत आहे याचा खुलासा केला नाहीये.

- Advertisement -

हे हि वाचा – ‘सिटाडेल’च्या सेटवर प्रियांका चोप्रा झाली जखमी,फोटो पाहून चाहते झाले हैराण !

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -