घरमनोरंजनसनी देओलच्या ‘बाप ऑफ ऑल फिल्म्स’मधील बीटीएस व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सनी देओलच्या ‘बाप ऑफ ऑल फिल्म्स’मधील बीटीएस व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Subscribe

90 च्या दशकातील बॉलिवूड सुपरस्टार अभिनेते सनी देओल, मिथुन चक्रवर्ती, जॅकी श्रॉफ आणि संजय दत्त हे सध्या त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. येत्या काही दिवसांत त्यांचा ‘बाप ऑफ ऑल फिल्म्स’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, आता या चित्रपटातील एक बीटीएस व्हिडीओ देखील समोर आला आहे. जो पाहून चाहते खूप उत्सुक झाले आहेत.

‘बाप ऑफ ऑल फिल्म्स’मधील बीटीस व्हिडीओ आला समोर

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

- Advertisement -

चित्रपटातील कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ‘बाप ऑफ ऑल फिल्म्स’चा एक बीटीएस व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सनी देओल, मिथुन चक्रवर्ती, जॅकी श्रॉफ आणि संजय दत्त अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. सोबतच यामध्ये जॉनी लीवर देखील दिसत आहेत आणि हे सर्व कलाकार मजामस्ती करताना दिसत आहेत. ‘बाप ऑफ ऑल फिल्म्स’चा हा व्हिडीओ चाहते खूप पसंत करत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत सनी देओल आणि जॅका श्रॉफने लिहिलंय की, “पडद्यावर हे करणार कमाल आणि पडद्याच्या मागे? तुम्ही स्वतःच पाहा. फुल ऑन धमाल, मजामस्ती, तुमच्यासाठी सेटवरील एक खास झलक”

दरम्यान, अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली नाही. मात्र, प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 2023 मध्ये चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जॅकी श्रॉफ यांनी शेअर केलेल्या या पोस्टरवर अनेक चाहत्यांसह बॉलिवूड कलाकारही कमेंट करत आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा :

अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ने केला 100 कोटींचा टप्पा पार

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -