घरमनोरंजनसनी देओलचा मुलगा करण अडकणार विवाहबंधनात; 'या' ठिकाणी होणार ग्रँड रिसेप्शन

सनी देओलचा मुलगा करण अडकणार विवाहबंधनात; ‘या’ ठिकाणी होणार ग्रँड रिसेप्शन

Subscribe

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू आणि अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल लवकर विवाहबंधनात अडकणार आहे. त्याचं लग्न विमल रॉयची नात द्रिशा रॉयसोबत होणार आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी या दोघांची एंगेजमेंट झाली होती. अशातच आता त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली आहे.

करण देओलचा लग्नसोहळा तीन दिवस असणार आहे. ज्याची तयारी धर्मेंद्रच्या बंगल्यामध्ये सुरु झाली आहे. 16 जून 2023 पासून करण आणि द्रिशाचं लग्नाचे विधी सुरु होणार असून ते 18 जूनपर्यंत चालतील.

‘या’ ठिकाणी असणार करण देओलच्या लग्नाचे रिसेप्शन

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Deol (@imkarandeol)

- Advertisement -

सूत्रांच्या माहितीनुसार, 18 जून रोजी करणच्या लग्नाचे रिसेप्शन असणार आहे. जे वांद्रे येथील लँड्स एंड हॉटेलमध्ये होणार आहे. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडचे आणि टॉलिवूडचे अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

गुपचूप केली होती एंगेजमेंट

- Advertisement -

करण आणि द्रिशा ने काही महिन्यांपूर्वी गुपचूप एंगेजमेंट केली होती. या दोघांनी धर्मेंद्र आणि त्यांची पहिली पत्नी यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्याच दिवशी एंगेजमेंट केली. त्यापूर्वी अनेकदा त्यांच्या डेटिंगची चर्चा सुरु होती. दोघांना अनेकदा मुंबईक एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं.

या चित्रपटात दिसणार करण देओल

अभिनेता करण लवकरच ‘ अपने 2 ‘ आणि ‘दे खो जरा ‘ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे . अभिनयासोबतच करणने ‘यमला पगला दीवाना 2 ‘ मधून सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही पदार्पण केले आहे.

 


हेही वाचा :

‘सैराट’ फेम अभिनेता आकाश ठोसर दिसणार बाल शिवाजीच्या भूमिकेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -