Eco friendly bappa Competition
घर नवी मुंबई मुंबई विमानतळावरील भार लवकरच कमी होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

मुंबई विमानतळावरील भार लवकरच कमी होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

Subscribe

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हवाई पाहणी करण्यात आली. या विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील मोठा भार कमी होणार, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची (International Airport) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्याकडून हवाई पाहणी करण्यात आली. त्यानंतर रन-वे आणि टर्मिनल्सच्या इमारतीची पाहणी त्यांनी केली. 2017 साली या विमानतळाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. डिसेंबर 2024 पर्यंत हा विमानतळ खुला होईल, असा विश्वास या पाहणी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. या विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील मोठा भार कमी होणार, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अतिशय वेगाने सुरू; उपमुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

- Advertisement -

या पाहणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, नवी मुंबईचे हे विमानतळ मुंबई एमएमआरडीए क्षेत्र, पुणे, गोवा यांसह सगळ्याच राज्यासाठी महत्त्वाचे आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे भूमीपूजन करण्यात आले होते. समृद्धी, एमटीएचएल यासह नवी मुंबई विमानतळाचा शुभारंभही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच होणार असल्याचा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या ठिकाणी अतिशय गतीने आणि जोमाने काम सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले.

तर उलवे नदी, डोंगर, दगड कापणी यासारखी मोठी आव्हाने या प्रकल्पासमोर होती. आज पाहणी केली नेल्यानंतर बराच बदल झालेला दिसतो आहे. हवाई पाहणीत सगळीकडे सपाटीकरण झाल्याचे दिसून येत आहे. मुंबई विमानतळावर असलेला भार या विमानतळामुळे कमी होईल, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले. लवकरच म्हणजे साधारणतः डिसेंबर 2024 पर्यंत हे विमानतळ जनतेसाठी खुला होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. नवी मुंबई विमानतळाचे काम वेळेपूर्वी करण्याचा सरकारचा मानस असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

तर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी करण्याकरता मुख्यमंत्री आणि आम्ही सर्व याठिकाणी आलो आहोत. पहिल्यांदा या विमानतळाचा सर्व आवाका लक्षात यावा म्हणून हेलिक़ॉप्टरने या साईटची पाहणी केली. त्यानंतर जो रनवे बनतो आहे त्याची आणि टर्मिनल बिल्डींगची पाहणी केली. त्यानंतर या विमानतळासंदर्भात प्रेजेटेक्शन आमच्या समोर करण्यात आले. या विमानतळाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. खरं म्हणजे देशातील अतिशय युनिक अशाप्रकारचे हे विमानतळ आहे. 2017 साली या विमानतळाचे काम सुरू करण्यात आले असून 2024 पर्यंत हे विमानतळ ऑपरेशनल होईल अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीने अजून त्याला गती देण्यात यावी आणि त्यात काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यात याव्यात, हा खरा हेतू मुख्यमंत्र्यांचा दौऱ्याचा आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ट्रान्स हार्बर लिंकमुळे या विमानतळाला कनेक्टिव्हिटी मिळत असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोस्टल रोड, मेट्रोनंही या विमानतळ जोडला जाणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. एक मल्टीमॉडेल असणारा हा विमानळ 9 कोटी प्रवाशांना या विमानतळाचा फायदा घेता येणार आहे.

- Advertisment -