घरलाईफस्टाईलफिरायला जाताना अशी करा बॅग पॅक

फिरायला जाताना अशी करा बॅग पॅक

Subscribe

प्रवास आपल्याला आयुष्यातील सर्वाधिक सुंदर क्षण अनुभव देतो. त्याचसोबत भरगच्च भरलेले सुटकेस घेऊन चालणे मुश्लिक ही होते. जेव्हा तुम्ही प्रवासाला जाता तेव्हा बहुतांश गोष्टींची काळजी घ्यावी लागते. प्रवास करताना असे काही होते की, त्यावेळी समस्या उद्भवू शकतात.त्यामुळे प्रवासाला जाताना स्मार्ट पद्धतीने कशी बॅग पॅक कराल याच संदर्भातील टीप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. (Backpack Tips for travel)

एक लिस्ट तयार करा
लाइट पॅकिंगसाठी प्लॅनिंग फार महत्वाचे असते. प्रवासादरम्यान गरजेपेक्षा अधिक सामान भरण्याऐवजी एक लिस्ट तयार करावी. सुटकेसमध्ये सामान ठेवताना एक लिस्ट हातात ठेवा. अशा प्रकारे तुम्हाला कळेल की, नक्की काय घेऊन जायचे आहे आणि काय नाही.

- Advertisement -

वजन किती असेल हे ठरवा
जर तुम्ही नेहमीच ओव्हरपॅक बॅग भरण्याची चुक करत असाल तर ती करु नका. तुमच्या बॅगचे वजन किती असेल हे ठरवा. जेणेकरुन प्रवासादरम्यान ती अधिक जड वाटणार नाही.

- Advertisement -

मल्टीपर्पज शू सोबत ठेवा
तुम्ही प्रत्येक कपड्यांनुसार शू घेत असाल तर असे करु नका. यामुळे बॅगेचे वजन अधिक वाढले जाईल. त्यावेळी अशा रंगाचे शू ची निवड करा जे तुमच्या आउटफिट्स सोबत मॅच होतील. (Backpack Tips for travel)

वर्सेटाइल लेअर पॅक करा
शू नंतर आपले कपडे असतात ज्यामुळे आपल्या सामानाचे वजन वाढू शकते. कोणतेही असे कपडे पॅक करु नका जे तु्म्ही प्रवासादरम्यान पुन्हा घालू शकत नाहीत. त्याऐवजी असे कपडे पॅक करा जे तुम्ही लेअर किंवा मिक्स मॅच करुन घालू शकता.

ब्युटी किटमध्ये लहान बॉटल ठेवा
जेव्हा कधी तुम्ही प्रवास कराल तेव्हा तुमच्या ब्युटी किटमध्ये एक लहान बॉटल जरुर ठेवा. जसे की, शॅम्पू, बॉडीवॉश आणि कंडीशनरची लहान बॉटल ठेवा. त्याचे वजन ही अधिक होणार नाही.


हेही वाचा- लोणार सरोवराबद्दल ‘या’ रहस्यमय गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -