घरमनोरंजनSunny Leone मराठीतील 'शांताबाई' गाण्यावर धरणार ठेका! चाहत्यांची उत्सुकता वाढली

Sunny Leone मराठीतील ‘शांताबाई’ गाण्यावर धरणार ठेका! चाहत्यांची उत्सुकता वाढली

Subscribe

बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ अभिनेत्री सनी लिओनी तिच्या दिलखेचक अदांनी सगळेच घायाळ होतात. चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात. सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहता वर्ग आहे. अशातच सनीने चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. बॉलिवूडनंतर आता सनी लिओनी दुसऱ्यांदा एका मराठी चित्रपटात झळकणार आहे. हिंदी, तामिळसह अनेक चित्रपटांमधून चाहत्यांना घायाळ करणारी सनी लिओनी आता मराठीतील सुपरहिट गाण्यावर ठेका धरताना दिसणार आहे.

लवकरचं सनी संजीव कुमार निर्मित व दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘आमदार निवास’मधील ‘शांताबाई’ या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. यापूर्वी अभिनेत्री सनी लिओनी बॉईज या मराठी चित्रपटातील ‘कुठं कुठं जायच हनिमूनला’या गाण्यावर थिरकताना दिसली होती. आता ‘आमदार निवास’ या चित्रपटातील ‘शांताबाई’ या गाण्यावर आपली अदाकारी दाखवण्यास सज्ज झाली आहे. सनीच्या या मराठीतील आयटम साँगची चर्चा बॉलिवूडमध्येही सुरु झाली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये सनीच्या शांताबाई गाण्याची उत्सुकता वाढली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

- Advertisement -

२०१५ मध्ये ‘शांताबाई’ या गाण्याने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं. सोशल मीडियावरही या गाण्याने कोट्यावधीच्या घरात व्हीज मिळवले होते. सुमीत म्युझिकच्या मालकीचे हे गाणं आता जय जगदंब प्रोडक्शनने घेतलं आहे. याच गाण्याची नव्या रुपात आता बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात सनी लिओनी दिसणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर विष्णू देवा यांनी हे आयटम साँग कोरिओग्राफ केले आहे.

- Advertisement -

मूळ संजय लोंढे याच्या आवाजातील हे गाणं आता नितीन सावंत यांनी पुर्ननिर्मित केलं आहे. तर ‘आमदार निवास’ या चित्रपटाचे दिग्दर्शन हे संजीव कुमार राठोड करत आहेत. त्यामुळे बॉलिवूडनंतर सनी लिओनी दुसऱ्यांदा मराठी आयटम साँगमधून प्रेक्षकांना काय मोहिनी घातलेय याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


The Kashmir Filesच्या वादावर नाना पाटेकर म्हणाले, ‘समाजात फूट पाडणे ठीक नाही’

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -