घरमनोरंजन'सुपर डान्सर'चा फिनाले रंगणार

‘सुपर डान्सर’चा फिनाले रंगणार

Subscribe

सुपर डान्सर महाराष्ट्र’चा ग्रँड फिनॅले कोण ठरणार? हा ग्रँड फिनॅले येत्या ३१ डिसेंबर रोजी रंगणार आहे.

कोणत्याही रिऍलिटी शोचा पहिला दिवस आणि अंतिम फेरी हा प्रवास सर्वांसाठी वेगळाच असतो. पहिल्या दिवशी शो विषयी उत्सुकता असते तर अंतिम फेरीत कोण जिंकेल याविषयी कुतुहल असतं. आता संपूर्ण महाराष्ट्रात असचं कुतूहल निर्माण झालयं की कोण होणार ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’. १५ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चा ग्रँड फिनॅले सोहळा ३१ डिसेंबरला रंगणार आहे.

‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चे टायटल कोण?

इतके महिने स्पर्धकांमध्ये तयार झालेली चुरस संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आणि आता या स्पर्धेत ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चे टायटल कोण जिंकणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर गेले कित्येक महिने प्रत्येक स्पर्धक हे एका पेक्षा एक सुपर परफॉर्मन्स देत आहेत आणि त्यांच्यामध्ये असलेले युनिक टॅलेंट आपण सर्व जाणतोच. आता अंतिम सोहळ्यात डान्स कॉम्पिटीशन ही अजून टफ होणार आहे. वेगवेगळ्या पध्दतीचे डान्स-ऍक्ट होणार आहेत. अर्थात काय तर महाराष्ट्राला अंतिम सोहळ्यात अजून जास्त दमदार, जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. स्पर्धकांच्या परफॉर्मन्सला दाद देण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि सुपर परफॉर्मन्सचे साक्षीदार होण्यासाठी सोनी मराठी वरील हलक्या-फुलक्या मालिकेतील कलाकार आणि महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी या सोहळ्यात सुपर एनर्जीने आणि आनंदाने सामिल झाले आहेत.

- Advertisement -

पाहुणे कलाकारांनी स्पर्धकांसोबत केलेली धमाल, स्पर्धकांकडून घेतलेली त्यांच्या युनिक टॅलेंटची टीप, काही भावनिक क्षण आणि जजेसचे हटके आणि ग्लॅमरस परफॉर्न्स पाहण्यासाठी आणि अर्थात कोण ठरणार विनर हे जाणून घेण्यासाठी पाहा ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चा ग्रँड फिनॅले पाहावा लागणार आहे. सुपर डान्सर महाराष्ट्र’चा ग्रँड फिनॅले येत्या ३१ डिसेंबरला रात्री ९ वाजता सोनी मराठी वर पाहता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -