घरमनोरंजनसुशांत - अंकिताचे या कारणांमुळे झाले ब्रेकअप

सुशांत – अंकिताचे या कारणांमुळे झाले ब्रेकअप

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आता या जगात नाही. मात्र त्याच्या मृत्यूनंतर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी लढा देणार त्याची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या चर्चेत आली आहे. छोट्या पडद्यावर पवित्र रिश्ता या मालिकेतील मानव आणि अर्चना ही भूमिका साकारणारे सुशांत आणि अंकिता खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे सुशांत २०१३ साली सिनेसृष्टीत आला. तब्बल सहा वर्षाच्या नात्यानंतर या दोघांचे ब्रेकअप झाले. सध्या सुशांतच्या मृत्यूचे प्रकरण चर्चेत असतानाच या दोघांमध्ये नेकमे ब्रेकअप का झाले याचेही कारण समोर आले आहे.

सुशांत आणि अंकिता एकमेकांसोबत आनंदी होते. ते दोघेही लग्नही करणार होते. मात्र अचानक त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली. त्या दोघांनीही कधीही याचे कारण समोर आणले नाही. सुशांत आणि अंकिता यांनी पवित्र रिश्ता या मालिकेनंतर झलक दिखला जा या रिअॅलिटी डान्स शोमध्ये भाग घेतला होता. या शोमध्ये त्याने अंकिताला सर्वांसमोर प्रमोज केले होते. २०१६ साली ते दोघे लग्न करणार होते. मात्र याच वर्षी सुशांत आणि अंकिता वेगळे झाले.

- Advertisement -

सुशांत चित्रपटांमध्ये काम करू लागल्यानंतर अंकिता खुपच अस्वस्थ झाली होती. ती सतत सुशांतला फोन किंवा मेसेज करून त्याची चौकशी करायची. इतर अभिनेत्रींसोबतचे जवळीक साधणारे सीन तिला अस्वस्थ करायचे. याबाबत अनेकदा सुशांतने अंकिताला समजावले की त्याच्या आयुष्यात अंकितशिवाय दुसरे कोणीही नाही. काही काळासाठी अंकिता शांत झाली. मात्र पुन्हा तिने सुशांतला क्रॉस प्रश्न करण्यास सुरूवात केली. हळूहळू सुशांतही तिच्या या वागण्याला वैतागला आणि कालांतराने ते वेगळे झाले. मात्र सुशांत अंकिताला कधीही विसरू शकला नाही. याचा खुलासा त्याला ट्रिटमेंट देणाऱ्या डॉक्टरांनीही आताच्या तपासांमध्ये केला आहे.

हेही वाचा –

मुंबईत मलेरियाचे थैमान; ऑगस्टमध्ये सापडले १ हजार १३७ रुग्ण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -