घरमनोरंजन‘ऐतिहासिक मालिकांवरून होणाऱ्या वादात कलाकारांना ओढू नये’

‘ऐतिहासिक मालिकांवरून होणाऱ्या वादात कलाकारांना ओढू नये’

Subscribe

कलर्स मराठी ९ सप्टेंबरपासून ’स्वामिनी’ ही नवी मालिका सुरू होत आहे. रमा –माधव पेशवे यांच्यावर आधारीत ही मालिका आहे. या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर मुख्य गोपिका बाईच्या भुमिकेत आहे. या मालिकेच्या निमित्ताने गोपिकाबाई साकारताना कशी तयारी केली याबद्दल सांगतेय ऐश्वर्या नारकर.

१. ऐश्वर्या नारकर ते गोपिकाबाई कसा आहे प्रवास?

– खूप छान वाटतं गोपिकाबाई करताना. सगळ्यांना आपल्याला छान दिसलेलं आवडतं परंतू हे सगळं सांभाळणं खूप कठीण आहे. एवढे सगळे दागिने घालून वावरणं खूप कठीण आहे. सवय नाहीये आपल्याला रोज एवढं घालण्याची त्यामुळे थोडं त्रासदायक होतं. साधारण गोपिकाबाई म्हणून तयार व्हायला एक ते दीड तास लागतात. साडी, दागिने,खोपा एगदी बारीक सारीक लक्षात ठेवून घालावं लागतं.  पण आपलं काम बघितलं की खूप छान वाटतं. एवढ्या घेतलेला त्रास निघून गेल्यासारखा वाटतो. एकणूच मी गोपिकाबाई म्हणून तयार होताना खूप मज्जा करतेय.

२. आजपर्यंत तुला कधीही न बघितलेल्या भुमिकेत तुला प्रेक्षक स्विकारतील का?

– मी मनापासून भुमिका करतेय. कारण खरच आजपर्यंत मला प्रत्येक मालिकांमध्ये खूप रडा रड, एक चांगली आई सगळ्यांना सारखी सांभाळून घेणारी. पण आता माझ्या आतापर्यंतच्या भुमिकांपेक्षा वेगळी भुमिका मला मिळाली आहे. त्यामुळे मी मोकळेपणाने या भुमिकेत वावरते. भुमिकेला थोडीशी ग्रे शेड आहे. पात्राला थोडं रंजक करण्यासाठी ते जास्त निगेटीव्हकडे झुकले आहे. पण ती तिच्या नवऱ्याच्या, मुलांच्याबाबतीत खूप पॉझिटीव्ह आहे. तीचा खूप जीव आहे आपल्या मुलांवर. या प्रेमापोटीच मुलांना पेशवाई मिळावी यासाठी ती राजकारण करत असते. यासाठी ती जी पाऊलं उचलते ती काही वेळा चुकीची ठरतात.

- Advertisement -

३. सृष्टी पगारेची ही पहिली मालिका आहे, तीच्याबद्दल काय सांगशील?

– सृष्टीचा आणि माझा मालिकेत छत्तीसचा आकडा आहे. ती मालिकेतही माझ्याशी चांगलीच वागते. कधीच उलट उत्तर देत नाही. पण गोपिकेला कायम वाटत असतं ती आपल्या तोलामोलाची नाहीये. पण ती हूशार खूप आहे. सृष्टी खूप गोड मुलगी आहे. मुळात ती लाडावलेली नाहीये. त्यामुळे तीची सेटवरही अपेक्षा नसते की कोणी आपले लाड करावेत. त्यामुळे आमचं कामही सोप्प होतं. ती प्रत्येक सीन खूप मनापासून करते. तीला खूप प्रश्न पडतात. हा सीन असाच का आहे? मी जोडाव्याच का घालायच्या आहेत? असे अनेक प्रश्न ती विचारते त्यामुळे तीने केलेले सीन खोटे वाटत नाहीत. खूप नॅचरल आणि समजून केलेले वाटतात.

४. अविनाश नारकरांची मालिकेत कमतरता जाणवते का?

– आम्ही अनेक वर्ष एकत्र काम करतोय. आजपर्यंत अनेक मालिका, नाटकांमधून आम्ही एकत्र काम केलं आहे. आमची केमिस्ट्री ऑफस्क्रीन जशी आहे तशीच ऑनस्क्रीनही केमिस्ट्री तशीच आहे. तो खूप ताकदीचा नट आहे. कायम त्याच्याबरोबर काम करताना खूप शिकायला मिळतं. त्याने आजवर अनेक ऐतिहासिक भुमिका केल्या आहेत. त्यामुळे त्याच्याकडून काही शिकायला मिळालं असतं. कारण माझी ही ऐतिहासिक पहिलीच भुमिका आहे. त्या भुमिकेचा बाज, लहेजा हे सगळं माझ्यासाठी नवीन आहे. ते त्याच्याकडून नक्की शिकायला मिळालं असतं.

- Advertisement -

५. ऐतिहासिक मालिकांवरून अनेकवेळा वाद होतात कलाकार म्हणून तू कशी बघतेस?

– मला असं वाटतं की खरतर वाद होऊ नयेत. इतिहास हा एकच आहे. पण तो कोणत्या बाजूने बघतोय हे महत्त्वाचं आहे. त्यावर मतं बदलत असावीत. प्रत्येक मालिकेच्या मागे एक मोठी टीम असते. ती टीम पुर्ण रिसर्च करून एखादी मालिका तयार करते. टीम ने गोळा केलेली माहिती ही बरोबर असते कारण यात अनेक इतिहासकार, पुस्तकांचा आधार घेतलेला असतो. आम्ही कलाकार फक्त त्याचा एक भाग असतो. आमच्या समोर जे येईल ते काम प्रामाणिकपणे करत असतो. त्यामुळे जर का एखादा वाद झाला तर त्यात कलाकारांना ओढू नयेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -