घरमनोरंजनवाळवी चित्रपटात पुन्हा एकत्र झळकणार स्वप्नील आणि सुबोध

वाळवी चित्रपटात पुन्हा एकत्र झळकणार स्वप्नील आणि सुबोध

Subscribe

नववर्षाच्या सुरुवातीलाच ‘वाळवी’ सिनेमाचा दिमाखदार ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. ट्रेलरमध्ये स्वप्नील जोशी आणि अनिता दाते नवरा बायको दिसत असून, ते आत्महत्या करण्याचा निर्णय घेत आहेत. मात्र हा स्वप्नीलने आखलेला डाव असून, यात त्याला शिवानी मदत करत असल्याचे दिसतेय. हे सगळं होत असतानाच सुबोध त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. क्षणोक्षणी कुतूहल वाढवणारा आणि गूढ असणाऱ्या ‘वाळवी’त स्वप्नील आणि शिवानीचा मनसुबा पूर्ण होणार की, आखलेला डाव फिरणार? सुबोधकडे असे नक्की काय गुपित आहे? वाळवीचा या सगळ्याशी काय संबंध? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला १३ जानेवारीला चित्रपटगृहात मिळणार आहेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -