घरमनोरंजनएका वेगळ्या वळणाची 'समांतर' गोष्ट!

एका वेगळ्या वळणाची ‘समांतर’ गोष्ट!

Subscribe

एकाचा भूतकाळ दुसऱ्याच भविष्य असेल तर काय घडू शकत? या आशयाला अनुसरून एक थरारक कथा एम एक्स प्लेअरने समांतर या वेबसिरीज च्या रूपात प्रकाशित केली आहे. मराठी साहित्य हे किती समृद्ध आणि प्रयोगशील आहे, किती महत्वपूर्ण आहे तसेच ते महाराष्ट्र किंवा एका विशिष्ट वर्गापुरतं मर्यादित राहू नये म्हणूनच समांतर ही मराठमोळी कथा अमराठी तसेच बहुसंख्य जगभरच्या प्रेक्षकांपर्यंत पोहचावी, तिला भाषेचे बंधन नसावं म्हणून मराठी व्यतिरिक्त इतर ३ भाषा म्हणजेच हिंदी, तेलगू आणि तमिळ भाषांमध्ये ही वेबसिरीज प्रदर्शित करण्यात आली.

- Advertisement -

एवढंच नाही तर जगभरात समांतर ला पोहोचवता याव म्हणून इंग्रजी सबटायटल सुद्धा देण्याचा निर्णय एम एक्स प्लेयरने घेतला. यामुळे मराठी साहित्य आणि कलाकार यांच्यावर सकारत्मक परिणाम होईलच त्याच बरोबर मराठी इंडस्ट्री ही मर्यादित प्रेक्षकांपूर्ती सीमित न राहता जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. समांतर ही मराठी वेब सीरिज १३ मार्चला एम एक्स प्लेयर या विनामूल्य माध्यमावर प्रदर्शित करण्यात आली आहे. सुहास शिरवळकर यांच्या लिखित स्वरूपातील साहित्याचे सोनेरी पडद्यावर रूपांतरण होण्याची ही तिसरी वेळ आहे. हरहुन्नरी आणि दर्जेदार कलाकृती देणारा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला दिग्दर्शक म्हणून ज्याची ओळख आहे अश्या सतीश राजवाडे याने या वेबसिरीजचे दिग्दर्शन केले आहे. स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित जवळ-जवळ ५ वर्षांनंतर पुन्हा एकदा या वेबसिरिजच्या निमित्ताने वेब सारख्या नव्या माध्यमावर एकत्र दिसत आहेत. सतीश राजवाडे, स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित यांची समांतर ही पहिलीवहिली मराठी वेबसीरिज आहे.

या वेबसिरीजचा नायक म्हणजेच कुमार महाजन स्वतःच्या भविष्याविषयी पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रवासाला निघतो. त्याच्या भविष्याचा आणि सुदर्शन चक्रपाणी या व्यक्तीचा नक्की संबंध काय हे शोधण्याची त्याची धडपड आणि त्याची चित्तथरारक गोष्ट एम एक्स ओरिजिनलची निर्मिती असलेली ‘समांतर’ ही वेबसिरीज उलघडते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -