घरताज्या घडामोडीमुंबईत करोनाचा पहिला बळी; ६४ वर्षीय रुग्णाचा मृत्यू

मुंबईत करोनाचा पहिला बळी; ६४ वर्षीय रुग्णाचा मृत्यू

Subscribe

करोना व्हायरसमुळे भारतात तीसरा मृत्यू झाला आहे. मुंबईतील ६४ वर्षीय रुग्णाचा व्हायरसमुळे मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पहिला मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. या रुग्णाला इतरही आजर असल्याचे सांगितले जात आहे. सध्या भारतात १२८ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आहेत. तर महाराष्ट्रात ३९ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. सदर रुग्ण दुबईहून आल्याचे सांगितले जात असून सध्या ते कस्तुरब रुग्णालयात उपचार घेत होते.

- Advertisement -

याआधी कर्नाटकात एक वृद्ध आणि दिल्लीमध्ये एका महिलेचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे. कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झालेल्या रुग्ण याआधी हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना ८ मार्च रोजी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यांना आधीपासूनच उच्च रक्तदाब, मधुमेह असे आजार होते. रुग्ण व्यावसायिक असून ते दुबईहून प्रवास करुन मुंबईत आले होते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -