घरट्रेंडिंगकंगना म्हणाली, ही तर 'बी ग्रेड' अभिनेत्री, तापसीने दिलं सडेतोड उत्तर!

कंगना म्हणाली, ही तर ‘बी ग्रेड’ अभिनेत्री, तापसीने दिलं सडेतोड उत्तर!

Subscribe

अभिनेत्री कंगना रणावत आपल्या वक्तव्यांमधून चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाही. ती स्वत: बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम करते, पण तिची बरीच विधाने ही या इंडस्ट्रीविरोधात असतात. सुशांत प्रकरणातही कंगनाने बॉलिवूडमधील अनेक गोष्टी लोकांसमोर आणल्या. आता कंगना आणि तीच्या एका वक्तव्यामुळे तीच्यात आणि तापसी पन्नूमध्ये ट्विटरवॉर रंगणार असच दिसतय.

- Advertisement -

नुकत्याच झालेल्या मुलाखतीत कंगनाने तापसी पन्नूवर हल्ला चढवला होता. त्यांनी टॅप्सीला बी ग्रेड अभिनेत्री म्हटलं. कंगना म्हणाली- तापसीसारखे लोक म्हणतात की त्यांना घराणेशाहीचा त्रास नाही, त्यांना करण जोहर खूप आवडतो, पण मग आपल्यासारख्या बी ग्रेड अभिनेत्री ज्या दिसायलाही चांगल्या आहेत त्यांना काम का मिळत नाही.

यावर तापसीनेही कंगनाला सडेतोड उत्तर दिलं आहे. तापसीने ट्विटरवर म्हटलं आहे की, ‘बारावी आणि दहावीनंतर आता आमचेसुद्धा निकाल समोर आले आहेत असं मी ऐकलंय. आमचं ग्रेड सिस्टम आता अधिकृत झालंय का? आतापर्यंत तर नंबर सिस्टमवर एखाद्याचं महत्त्व सिद्ध व्हायचं’, असं म्हणत तापसीने कंगनाची शाळा घेतली आहे.

- Advertisement -

मुलाखतीत काय म्हणाली कंगना

आणि हे कलाकार म्हणतात फक्त कंगनालाच घराणेशाहीचा त्रास होतो पण आमचं करण जोहरवर प्रेम आहे. जर तुम्हाला करण जोहर इतका आवडतो, तर तुम्ही बी ग्रेड अभिनेत्री का आहात? तुम्ही तर आलिया भट्ट आणि अनन्या पांडेपेक्षा चांगले दिसता. तुम्ही चांगल्या अभिनेत्री आहात. तरी तुम्हाला काम का मिळत नाही. असं कंगनाने त्या मुलाखतीत म्हटलं होतं.

त्यावर तापसीने हिंदुस्तान टाइम्स दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, “करण जोहर मला आवडतो असं मी कुठेही म्हटलं नाही. त्याचप्रमाणे करण जोहरचा मला राग येतो असंही मी म्हटलं नाही. मी तर त्याला फारशी ओळखतसुद्धा नाही. मीसुद्धा संघर्ष केलाय पण फक्त त्याची मार्केटिंग कधी केली नाही. गेल्या तीन वर्षांपासून मी दर वर्षी किमान चार चित्रपटांत काम केलंय. नुकतीच माझ्या पाच आगामी चित्रपटांची घोषणा झाली. कोण म्हणतंय की मला काम मिळत नाही?


हे ही वाचा – सुशांत सिंह राजपूतची प्रेयसी रिया चक्रवर्तीला बलात्काराची धमकी; गुन्हा दाखल


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -