पावसाचा जोर ओसरला तरी ‘या’ राज्यात कमी दाबाचा पट्टा कायम!

heavy rainfall

कोकणासह राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे कारण कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाली आहे. येत्या काही दिवसात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या आठवडय़ात कोकण विभागासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली होती.

किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्यामुळे मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभागात गेल्या आठवडय़ात दमदार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्राच्या घाटक्षेत्रातही मोठय़ा पावसाची हजेरी होती. मुबंईत अक ठिकाणी पाणी साचले. दादर हिंदमाता, अंधेरी सबवे परिसर जलमय झाला होता. याचा परिणाम वाहतूकीवर झाला.

मुंबई कोकणासह विदर्भातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत आताही कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्याची तीव्रता कमी आहे. त्यामुळे पावसाचा जोर कमी झाला आहे. तरी पाऊस पूर्ण थांबण्याची शक्यता नाही. मुसळधार किंवा अतिवृष्टीची शक्यता नसली, तरी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोकण विभागासह इतरत्र काही ठिकाणी कायम राहणार आहेत.


हे ही वाचा- १ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यास मुंबईतील ९७ टक्के पालकांचा विरोध