घरदेश-विदेशयंदा IIT प्रवेशासाठी बारावीतील गुणांची अट रद्द

यंदा IIT प्रवेशासाठी बारावीतील गुणांची अट रद्द

Subscribe

यंदा IIT प्रवेशासाठी बारावीतील गुणांची अट रद्द करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील काही शिक्षण मंडळांच्या परीक्षा झाल्या नव्हत्या. तर काही मंडळांनी सरासरी गुण दिले आहेत. यामुळे देशातील सर्व IITच्या संयुक्त परीक्षा मंडळाने यंदा प्रवेशासाठी बारावीचे गुण विचारात न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

IIT प्रवेशासाठी जेईई मेन, जेईई अॅडव्हान्स्ड या परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक असतं. जेईई मेन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र ठरतात. ही परीक्षा देणारे विद्यार्थी देशातील सर्व IIT आणि NIT मध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरतात. शिवाय, या विद्यार्थ्यांना मिळालेले बारावीचे गुण देखील ग्राह्य धरले जातात. IITमध्ये प्रवेशासाठी या विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स्डच्या गुणांबरोबरच बारावीत ७५ टक्के किंवा टॉप २० परसेंटाइल गुण आवश्यक असतात. मात्र, यावर्षी विद्यार्थ्यांचे बारावी परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत. मात्र विद्यार्थी बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. तसेच जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षाही उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याबाबत नुकतीच देशातील मुंबईसह सर्व ‘आयआयटी’च्या संचालकांची बैठक झाली. त्यानंतर संयुक्त परीक्षा मंडळाने याबाबतचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा दिला. याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांनीही ट्वीटद्वारे माहिती दिली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -