घरमनोरंजन... म्हणून 'जेठालाल'ने घेतला होता अभिनय क्षेत्रापासून दूर जाण्याचा निर्णय

… म्हणून ‘जेठालाल’ने घेतला होता अभिनय क्षेत्रापासून दूर जाण्याचा निर्णय

Subscribe

टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा गेली १३ वर्षे प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला आज प्रेक्षकांनी आजवर डोक्यावर घेतले. यातील जेठालाल या पात्र प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. जेठालाल भूमिकेमुळेच आज दिलीप जोशी हे नव घराघरात पोहचले. १९८९ साली दिलीप जोशींना अभिनय क्षेत्रात आपले नशिब आजमवण्यास सुरुवात केली. मैने प्यार किया हा त्यांचा पहिला सिनेमा. सिनेमातील भूमिका जरी छोटी असली तर ती आजही प्रेक्षकांना लक्षात आहे.

त्यानंतर दिलीप जोशीं सब वाहिनीवरील ‘तारक मेहता…’ मधील ‘जेठालाल’ भूमिकेत काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी नवीन असणारी ही मालिका आज लाखो प्रेक्षकांची आवडीची मालिका ठरत आहे. परंतु जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशी यांनी कधीकाळी अभिनय क्षेत्रापासून दूर जाण्याचा निर्णय घेता होता. एका जुन्या मुलाखतीत जेठालाल यांनी यासंदर्भात खुलासा केला आहे. या मुलाखतीचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात त्यांनी एकूणच त्यांच्या संषर्घाबद्दल आणि मालिकेतील प्रवासाबद्दलचे अनुभव शेयर केले आहेत.

- Advertisement -

याविषयी दिलीप जोशींनी सांगितात की “तारक मेहता का उल्टा चष्मा मालकेची ही कथा ऐकताच मला प्रचंड आवडली. निर्माते असित मोदींनी माझा विचार चंपकलाल आणि जेठालाल या दोन पात्रासाठी केला होता”. यावेळी दिलीप जोशींनी चंपकलालच्या भूमिकेसाठी नकार देऊन जेठालालची भूमिकेसाठी प्रयत्न करतो असे निर्मात्यांना सांगितले. मात्र दिलीप जोशी जेठालालची भूमिका साकारू शकतील असा विश्वासच नव्हता मात्र निर्मात्यांनी दिलीप जोशींना धीर देत विश्वास दाखवला. आणि अशाप्रकारे मला जेठालालची भूमिका मिळाल्याचे दिलीप जोशी सांगतात.

- Advertisement -

सास बहूच्या मालिका विश्वात प्रेक्षकांचे मनोरंजन होईल असे काही तरी वेगळे करायचे होते. यावर दिलीप जोशी त्यांच्या संघर्षाच्या काळाबद्दल सांगतात, “तारक मेहता मालिकेआधी जवळपास एक वर्ष माझ्याकडे काहीच काम नव्हते, मी ज्या मालिकेत काम करत होतो ती मालिका देखील बंद झाली. यावेळी मी अभिनय क्षेत्र सोडायचा विचार केला. पण तारक मेहतामुळे मी या क्षेत्रात अजूनही आहे”असा खुलासा त्यांनी केला. तारक मेहता ही मालिका ‘दुनिया ने उधाण चष्मा’ या कॉलमवरुन प्रेरित आहे. या मालिकेचा पहिला भाग २८ जुलै २००८ रोजी प्रदर्शित झाला होता.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -