Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन पर्ल पुरीच्या अटकेनंतर एकता कपूर आणि पीडितेच्या आईची कथित ऑडियो क्लिप व्हायरल

पर्ल पुरीच्या अटकेनंतर एकता कपूर आणि पीडितेच्या आईची कथित ऑडियो क्लिप व्हायरल

डियो क्लिपमध्ये एकता कपूर पर्लची बाजू मांडताना बोलत आहे की तो निर्दोष आहे.

Related Story

- Advertisement -

नागिन ३’ (‘Nagin 3) या प्रसिद्ध टिव्ही मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता पर्ल व्ही पुरीला (Pearl V Puri) काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी पर्ल व्ही पुरीला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोस्को (POSCO) कायद्याअंर्तगत अटक करण्यात आली होती. ४ जून रोजी अभिनेता पर्ल व्ही पुरीला IPC कलम CR IPC ३७६AB,R\w पोस्को कायदा ४,८,१२,१९ आणि २१ अंतर्गत अटक करण्यात होती. पर्लच्या अटकेनंतर अनेक टीव्ही सेलिब्रिटी पर्लला पाठिंबा देण्याकरिता सोशल मीडियावर उतरले आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर एकता कपूरची एक कथित ऑडियो क्लिप तूफान व्हायरल होत आहे

काय आहे व्हायरल ऑडियो क्लिप मध्ये-

व्हायरल होणार्‍या ऑडियो क्लिपमध्ये एकता कपूर  (Ekta Kapoor Viral Audio) पीडितेच्या आई सोबत बोलत आहे. ऑडियो क्लिपमध्ये एकता कपूर पीडितेच्या आईला विनवणी करत आहे की तुम्ही खरं  काय ते लोकांना सांगा. तसेच ऑडियो क्लिपमध्ये एकता कपूर पर्लची बाजू मांडताना बोलत आहे की तो निर्दोष आहे. तसेच अजूनही तुम्ही गप्प का आहात. या संभाषणानंतर पीडितेची आई बोलते की,मी माझ्या पतीमुळे गप्प आहे.  ऑडियो क्लिपमध्ये स्पष्ट होत आहे की पीडितेची आई पर्ल पुरीला सपोर्ट करत असून घरच्यांना घबरात आहे. तसेच पीडितेच्या वडील पर्ल पुरीची इमेज खराब करण्याकरिता त्याच्यावर खोटे आरोप लावत असल्याचे दिसत आहे असे व्हायरल होणार्‍या ऑडियो क्लिप द्वारे स्पष्ट होत असल्याचे मत नेटकरी मांडत आहे. अद्याप व्हायरल होणारी ऑडियो क्लिप खरी आहे की खोटी याचे स्पष्टीकरण झाले नाहीये. पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. यादरम्यान अनेक कलाकार पर्लला सपोर्ट करत #istand withe pearl puri हा टॅग देत त्याला पाठिंबा देत आहे.


- Advertisement -

हे हि वाचा – जान्हवी कपूर अंशुलाच्या भेटीला, हिंदुजात घेतेय उपचार

- Advertisement -