Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन जान्हवी कपूर अंशुलाच्या भेटीला, हिंदुजात घेतेय उपचार

जान्हवी कपूर अंशुलाच्या भेटीला, हिंदुजात घेतेय उपचार

अंशुला मानसिक आरोग्याच्या मुद्यांववर आपले मत मांडत सोशल मीडियावर लोकांना संदेश देत आहे. 

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याची (Arjun Kapoor) बहीण तसेच निर्माता बोनी कपूर (Bony Kpoor) यांची मुलगी अंशुला कपूर(Anshula Kapoor) हिला शनिवारी 5 जून रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या अंशुला मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल असून उपचार घेत आहे. अंशुलाला रक्तदाब आणि डायबिटीजचा त्रास असल्यामुळे तिला रेग्युलर चेकअपसाठी रुग्णालयात भरती  केलं असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच तिला काही दिवसातच रुग्णालयातून सोडण्यात येणार असल्याचे देखील बोलण्यात येत आहे. रुग्णालयात उपचार घेत असताना अंशुलाला भेटण्यासाठी जान्हवी कपूर रुग्णालयात पोहोचली. बॅगी टीशर्ट,ट्रॅक पॅंट,आणि चश्मा असा पेहराव करून जान्हवी रुग्णालयात दाखल झाली तेव्हा रुग्णालयाबाहेर असलेल्या पॅपराझिने तिला कॅमेरात कैद केले.

photo courtesy-Viral Bhayani

- Advertisement -

डीएनएच्या रिपोर्टनुसार अर्जुन,अंशुला दोघेहीऑनलाइन सेलिब्रिटी फंडरेजिंग पॅल्टफॉर्म फॅनकाइंडच्या अंतर्गत संपूर्ण भारतात जास्तीत जास्त लोकांची मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. दोघांनीही 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली आहे आणि 30 हजार पेक्षा अधिक लोकांची तसेच कुटुंबाची मदत केली आहे. तसेच सध्या अनेक कलाकार त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटचा वापर लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याकरिता करत आहेत. याचप्रमाणे अंशुला मानसिक आरोग्याच्या मुद्यांववर आपले मत मांडत सोशल मीडियावर  लोकांना संदेश देत आहे.


हे हि वाचा – मार्वलच्या सिरिज मध्ये झळकणार पाकिस्तानी अभिनेता फवाद खान ?

- Advertisement -