Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी नागपूरच्या नियमावलीत बदल, बार १० वाजेपर्यंत सुरु!

नागपूरच्या नियमावलीत बदल, बार १० वाजेपर्यंत सुरु!

नागपूर शहरात काय सुरु आणि काय बंद आहे जाणून घ्या.

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे आता अनलॉक करण्यात येत आहे. तर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूरचा समावेश पहिल्या श्रेणीत करण्यात आला आहे. मात्र, असे असले तरी देखील नागपूर शहरातील निर्बंध सरसकट उठवण्यात आलेले नाहीत. काही निर्बंध शिथिल करण्यात आले असून काही निर्बंध कडक करण्यात आले आहेत. नागपूर शहरात काय सुरु आणि काय बंद आहे जाणून घेऊया.

काय आहे नागपूरची नियमावली?

 • आवश्यक वस्तूची दुकाने संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार
 • अत्यावश्यक दुकाने वगळून सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरु
 • रेस्टारंट, बार ५० क्षमतेने रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार
 • वॉकिंग सकाळी ५ ते ९, संध्याकाळी ५ ते ९ राहील
 • सरकारी आणि खाजगी ऑफिस १०० टक्के उपस्थितीने संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरु
 • मॉल्स, थिएटर, मल्टिप्लेक्स संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहणार
 • खेळाचे मैदान, क्रीडांगण, उद्यान सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत सुरु
 • लग्न समारंभाला १०० लोकांपर्यंत मर्यादा किंवा मंगल कार्यालयाची, ५० टक्के क्षमता
 • अंत्यसंस्कार जास्तीत जास्त ५० लोकांपर्यंत परवानगी
 • जिम, सलून, पार्लर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार
 • स्कूल, कॉलेज, कोचिंग क्लास बंद राहतील
 • धार्मिक स्थळ बंद राहतील (समितीचे ५ लोकं दैनंदिन पूजा आणि स्वच्छतेसाठी जाऊ शकतील)

  हेही वाचा – अन्यथा पुन्हा लॉकडाऊनची वेळ


- Advertisement -