घरमनोरंजन‘अवतार 2’ चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगद्वारे कमवला करोडोंचा गल्ला

‘अवतार 2’ चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगद्वारे कमवला करोडोंचा गल्ला

Subscribe

हॉलिवूडचा बहुचर्चित चित्रपट ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ येत्या 16 डिसेंबर रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे. जेम्स कॅमरुनच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटाचे जगभरात चाहते आहेत. या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी संपूर्ण भारतामध्ये या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरु झाली होती. आता समोर आलेल्या माहितीनुसार, अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाच्या जवळपास लाखो तिकीटांची विक्री झालेली आहे.

‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये कमवला कोटींचा गल्ला

 

View this post on Instagram

 

A post shared by Avatar (@avatar)

- Advertisement -

‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ चित्रपट 16 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून सध्या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग देखील सुरु करण्यात आले आहे. हा चित्रपट भारतामध्ये हिंदी, इंग्लिश, मल्याळम, तमिळ, कन्नड आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची भारतामध्ये जवळपास 2 लाख तिकीटांची विक्री झाली आहे. या तिकीटांद्वारे 8.50 कोटींची कमाई करण्यात आली आहे.

2009 मध्ये प्रदर्शित झाला होता ‘अवतार’
दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांचा ‘अवतार’ हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला होता. आता जवळपास 13 वर्षांनी ‘अवतार’ चा दुसरा सिक्वेल ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अवतार’ चित्रपटाचा आता येत्या काळात दुसरा सिक्वेल येणार आहे. 2009 साली या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांच्या मनाला चांगली भुरळ पाडली होती. एका सामान्य कथेच्या आधारावर फक्त व्हिज्युअल इफेक्ट्सचा आधार घेऊन ‘अवतार’ चित्रपटाने जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी या चित्रपटाचा दुसरा सिक्वेल बनवण्याची घोषणा याआधीच केली होती. त्यामुळेच प्रेक्षक अनेक वर्षांपासून या चित्रपटाच्या दुसऱ्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘दृश्यम 2’ च्या यशाचा ‘भेडिया’ आणि ‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो’ला फटका

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -