घरदेश-विदेशबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ, कोकणासह राज्यातील 'या' जिल्ह्यांना इशारा

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ, कोकणासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना इशारा

Subscribe

मुंबई – बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. बुधवारी सायंकाळी हे चक्रीवादळ तयार झालं असून मंदोस असं या चक्रीवादळाचं (Mandos Cyclone) नाव ठेवण्यात आलं आहे. दक्षिणेतील राज्यात या चक्रीवादळामुळे पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तसंच, दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा अंदमानात आज चक्रीवादळ घोंगावणार, ‘या’ राज्यांना अतिवृष्टीचा इशारा

- Advertisement -

तामिळनाडूच्या किनारपट्टीवर ८ तारखेला हे चक्रीवादळ येणार आहे. यामुळे या भागातील १३ जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर, महाराष्ट्रातही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. कोकणात ८ आणि ९ डिसेंबर रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर, बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार आहे.

बंगालच्या उपसागरात दक्षिण-पश्चिम भागामध्ये दोन दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत होते. तसंच, त्याची तीव्रता सातत्याने वाढत गेली. त्यामुळे याचे चक्रीवादळात रुपांतर झाले. चेन्नई शहरापासून हे चक्रीवादळ ७०० किमी अंतरावर होते. आता हे वादळ उत्तर पश्चिम दिशेने जाण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीजवळ वादळ पोहोचल्यानंतर त्याची तीव्रता अधिक असणार आहे.

- Advertisement -

चक्रीवादळाचा परिणाम ११ डिसेंबरपर्यंत राहणार असून ९ डिसेंबरला दक्षिणेकडे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे महाराष्ट्रातील दक्षिणेकडील अनेक भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -