घरमनोरंजन...म्हणून भारतात प्रदर्शित झाला नाही ‘द लीजंड ऑफ मौला जट्ट’; निर्मात्यांनी दिली माहिती

…म्हणून भारतात प्रदर्शित झाला नाही ‘द लीजंड ऑफ मौला जट्ट’; निर्मात्यांनी दिली माहिती

Subscribe

सध्या पाकिस्तानातील ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. 13 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये अभिनेता फवाद खान आणि माहिरा खान यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला जगभरातील अनेक प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. अशातच हा चित्रपट आता भारतामध्ये प्रदर्शित होणार का? असा प्रश्न मागील अनेक दिवसांपासून अनेकांना पडला होता. हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ नये म्हणून भारतातील काही राजकीय नेत्यांकडून विरोध देखील करण्यात आला. 30 डिसेंबर रोजी हा भारतात प्रदर्शित होणार होता. परंतु पुन्हा एकदा या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख टाळण्यात आली आहे. याबाबत थिएटर समुहाचे आईनॉक्स अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. परंतु या चित्रपटाच्या प्रदर्शिनाची तारीख नक्की काय असेल याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

थिएटर समुहाच्या आईनॉक्स अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’चित्रपटाच्या वितरकांकडून सांगण्यात आलं की, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख टाळण्यात आली आहे. पुढे कोणती तारीख आम्हाला शेअर करण्यात आली नाही. जी स्टूडियोजने ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’चित्रपटाचे अधिकार मिळवले आहेत कारण त्यांना चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा होती. परंतु काही राजकीय पक्षांनी चित्रपटाला भारतात प्रदर्शिक करण्यास विरोध केला आहे.

- Advertisement -

मनसेकडून चित्रपटाला विरोध
‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’या पाकिस्तानी चित्रपटाला भारतात प्रदर्शित होऊन देणार नाही. अशी भूमिका मनसेची आहे. याबाबत चित्रपटगृहाच्या मालकांना ईशारा दिला आहे.

जगभरातून कमावले 200 कोटी
या चित्रपटाने जगभरातून 200 कोटींची कमाई केली आहे. भारतातील अनेक प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत आहेत. भारतात प्रदर्शित होताच या चित्रपटाच्या कमाईत वाढ पाहायला मिळेल.

- Advertisement -

Pakistani Actor Fawad Khan film The Legend Of Maula Jatt to release in India on 30 December read details inside The Legend Of Maula Jatt: फवाद खान की फिल्म 'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' अब भारत में भी देगी दस्तक, सामने आई रिलीज डेट

‘द लीजंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मौला जट्ट’ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन युनुस मलिकने केले होते. सध्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे सर्वत्र प्रचंड कौतुक केले जात आहे. या चित्रपटातील फवाद खान आणि माहिरा खानने बॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे.

 


हेही वाचा :

आम्ही देखील पत्रकार परिषद घेणार… तुनिषा प्रकरणी शीजानच्या बहिणीचं प्रत्युत्तर

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -