घरमनोरंजनआम्ही देखील पत्रकार परिषद घेणार... तुनिषा प्रकरणी शीजानच्या बहिणीचं प्रत्युत्तर

आम्ही देखील पत्रकार परिषद घेणार… तुनिषा प्रकरणी शीजानच्या बहिणीचं प्रत्युत्तर

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. हिंदी वाहिनीवरील ‘दास्तान-ए-काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकरात होती. तिने मालिकेच्या सेटवरील मेकअप रुममध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. वसईच्या कामन परिसरातील एका स्टुडिओमध्ये ही घटना घडली आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर संपूर्ण मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे. शिवाय तिचे कुटुंबीय देखील पूर्णपणे खचून गेले आहेत. पोलिसांनी संशयित आरोपी शीजान खानला अटक केली आहे. गुरुवारी तुनिषावर अंत्यसंस्कार झाले. शुक्रवारी तुनिषाच्या आईने पत्रकार परिषद घेऊन शीजान आणि त्याच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत.

तुनिषाच्या आईने केले शीजानवर गंभीर आरोप
पत्रकार परिषदेमध्ये तुनिषाच्या आईने शीजान आणि त्याच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले. त्यावेळी त्या म्हणाल्या की, “शीजान आणि त्याच्या कुटुंबियांकडून तुनिषावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला जात होता. तसेच तिला बुरखा घालण्यासही सांगण्यात आला होता. शीजानच्या घरचे तुनिषाला मानसिक त्रास देत होते.शूटिंग सुरु झाल्यापासून मागील 2-3 महिन्यात तुनिषाच्या वागण्यात खूप बदल झाला होता. शीजान तुनिषाला त्याच्या घरी घेऊन जायचा. शिवाय शीजानचे दुसऱ्या मुलीबरोबर संबंध असूनही शीजानने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं तो तुनिषाला महागड्या भेटवस्तू द्यायचा. तुनिषा शीजानवर प्रचंड प्रेम होती तरीही त्याने तिच्यासोबत ब्रेकअप केला. शिवाय ब्रेकअप केल्यानंतर तिला तुला जे हवं ते कर असं देखील म्हणाला. तुनिषा शीजानपेक्षा दहा वर्षांनी लहान होती. तुनिषा मानाने खूप भावनिक होती हा धक्का दिला सहन झाला नाही. त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी.”

- Advertisement -

शीजान खानच्या बहिणीचं प्रत्युत्तर
तुनिषाच्या आईने केलेल्या आरोपानंतर आता शीजानच्या बहिणीने देखील एका वृत्तवाहिनीला आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात म्हणाली की, “मी लवकरच एक पत्रकार परिषद घेऊन तुनिषाच्या आईने केलेल्या आरोपांना उत्तर देणार आहे. सध्या आमचं पहिलं काम आमचा भाऊ शीजान खान आहे. ज्याला पोलिसांनी अटक केली आहे.” त्यामुळे आता या प्रकरणात नक्कीच मोठे खुलासे पाहायला मिळतील.

 

- Advertisement -

हेही वाचा :

ब्रेकअपनंतर शीजान तुनिषाच्या मेसेजला रिप्लाय देत नव्हता, मुंबई पोलिसांनी दिली माहिती

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -