घरमनोरंजनदुबईतील प्रसिद्ध बुर्ज खलिफावर दाखवण्यात आली ‘भेडिया’ चित्रपटाची झलक

दुबईतील प्रसिद्ध बुर्ज खलिफावर दाखवण्यात आली ‘भेडिया’ चित्रपटाची झलक

Subscribe

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री कृति सेननचा आगामी ‘भेडिया’ चित्रपट मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत आहेत. दरम्यान, सध्या वरुण आणि कृति या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशातच आता वरुण आणि कृतिच्या ‘भेडिया’ चित्रपटाचा ट्रेलर दुबईतील सर्वात प्रसिद्ध बिल्डिंग बुर्ज खलीफावर दाखवण्यात आला आहे. वरुण आणि कृतिने हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

वरुण आणि कृतिने शेअर केला व्हिडीओ
वरुण आणि कृतिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दुबईतील सर्वात प्रसिद्ध बिल्डिंग बुर्ज खलीफावर आगामी ‘भेडिया’ चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये वरुण आणि कृति देखील प्रेक्षकांसोबत एन्जॉय करताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

- Advertisement -

दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिकने केलं असून चित्रपटात वरुण धवनने लांडगा बनून लोकांना घाबरवताना दिसेल. तर अभिनेत्री कृति सेनन या चित्रपटामध्ये डॉक्टर अनिका ही भूमिका साकारत आहे.

‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘भेडिया’
‘भेडिया’ चित्रपट येत्या 25 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘भेडिया’ चित्रपट ‘कॉमेडी हॉरर सिनेमा’ आहे. यामध्ये वरुण एका ‘मिलिट्री ऑफिसर खेत्रपाल’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. चित्रपटाचे शुटींग हे अरुणाचल प्रदेशच्या घनदाट जंगलात करण्यात आले आहे. खरंतर हा चित्रपट 2020 पूर्वीच रिलीज होणार होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट फार लांबणीवर पडला.चित्रपटात मोठ्या प्रमाणात विएफेक्स इफेक्ट्स प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. वरुण धवल आणि कृती सेनन यांच्या व्यतिरिक्त चित्रपटात अभिनेते अभिषेक बॅनर्जी आणि दीपक हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा :

वरुण धवनच्या ‘भेडिया’ चित्रपटातील ‘जंगल में कांड’ गाणं प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -